ग्रामपंचायत टवलारचे सचिव अजय देशमुख यांच्यावर शासकीय कर्तव्य पार पाडतांना केलेल्या कसुरीबाबत शिस्तभंग कारवाई करावी – युवाशक्ती ग्रामविकास संघठन इमरान पठाण
अमरावती- अचलपूर तालुक्यातील टवलार येथे जागेत अतिक्रमण केलेले आहे हे स्पष्ट झाल्यानंतर २३ सप्टेंबर २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी सदर अतिक्रमणवर तात्काळ निष्कासित करण्याची कारवाई करावी असा पत्राद्वारे आदेश दिला.
तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती अचलपूर यांनी सदर अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्याची कार्यवाही करणेबाबत ग्रामपंचायत टवलारचे ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी यांना १६ ऑक्टोबर २०२४ रोजी पत्र पाठविले होते ते पत्र पाठवून ०३ महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे.
तरी ग्रामपंचायत टवलारच्या ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी यांनी सदर अतिक्रमणवर आजपर्यंत सुध्दा कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.
ग्रामपंचायत टवलारच्या सचिव ग्रामपंचायत अधिकारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करून अतिक्रमणला प्रोत्साहन देण्याचे कार्य केलेले आहे.
म्हणजेच त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केलेले आहे. तसेच ग्रामपंचायत टवलारचे सरपंच व सदस्य अपात्रता व अतिक्रमनाच्या चौकशी दरम्यान बनावट खोटा मोकापाहनी अहवाल तयार करून सुध्दा त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केले आहे.
ग्रामपंचायत टवलारचे ग्रामसेवक अजय अंबादास देशमुख यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम, १९६७ व महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६४ नुसार शिस्तभंग कारवाई करण्यात यावी.
तसेच शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-१००५/३४/प्र.क्र.८/२००५/१८ दिनांक ०७ एप्रिल २००५ शासकीय कर्मचाऱ्याकडून शासकीय कर्तव्य पार पाडतांना होणाऱ्या विलंबाबाबत आणि कर्तव्य पालनातील कसुरीबाबत शिस्तभंग कारवाई करण्याबाबत, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अन्वये शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
सदर अतिक्रमणवर आतापर्यंतही कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. याचा पुरावा म्हणून दि. १९ जानेवारी २०२५ रोजी GEO MAP Camera ने काढलेले फोटो युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इमरान पठाण यांनी तक्रार अर्जासोबत जोडलेले आहे.
ग्रामपंचायत टवलारचे ग्रामसेवक/ग्रामपंचायत अधिकारी अजय अंबादास देशमुख यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी अशी तक्रार युवाशक्ती ग्रामविकास संघठन चे संस्थापक इमरान पठाण यांनी केली आहे..
यावेळी युवाशक्ती ग्रामविकास संघठनेचे संस्थापक इमरान पठाण, जिल्हाध्यक्ष प्रमोद घाटे,उपाध्यक्ष पवन पाटणकर, उपाध्यक्ष स्वप्नील चव्हाण, गावाकडची बातमीचे संपादक तथा युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे जिल्हा सचिव देवेंद्र भोंडे, सहकोषाध्यक्ष निलेश गजभिये, सुधिर तायडे, रामेश्वर सुलताने, सर्व पदाधिकारी उपस्थित होते.