चादुर रेल्वे / मागील काही दिवसांपासून जिल्ह्या सह चांदुर रेल्वे तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिके धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर पान बसणं जमिनीत तर पिके खराब झाले आहे, या पावसामुळे शेतातील अंतर्गत मशागती करण्यासाठी शेतकऱ्यांना वेळ मिळत नसल्याने शेतात तणाचे प्रमाण वाढत असून वाढलेले तण काढण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्चा करावा लागत आहे,तर या पाण्यामुळे पिके सुद्धा पिवळे पडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे, तर ढगाळ वातावरणामुळे कापूस सोयाबीन तुर पिकाची वाढ होताना दिसत नाही,ऑगस्ट महिन्यात परंतु पिकाची अर्धी वाढ होते पण सतत च्या पावसामुळे पिकांची वाड खुंपली आहे, पावसामुळे शेतात जाणारे मार्ग चिखलमय झाले कारणाने शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता तारेवर ची कसरत करावी लागत आहे
बॉक्स मध्ये (मी या वर्षी शेतामध्ये कापूस सोयाबीन तूर या पिकाची पेरणी केली प्रथम पाणी व्यवस्थित आल्याने चांगले उत्पन्न होईल अशी आशा होती परंतु आज मागील दहा दिवसापासून सतत धार झिर झीर पाण्यामुळे पिकापेक्षा तन वर आलेले दिसत आहे यामुळे उत्पन्न घटनेची दाट शक्यता नाकारता येत नाही असेच काही दिवस पाणी सुरू असले तर पिके खराब होऊ शकते,
प्रफुल निस्ताने कळमजापूर शेतकरी )