धामणगाव रेल्वे
मतदार संघातील धामणगाव रेल्वे चांदुर रेल्वे नांदगाव खंडेश्वर या तिन्ही तालुक्यातील बांधकाम कामगारांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार असून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही या योजनेचा कामगारानी लाभ घेण्याचे आवाहन आमदार प्रतापदादा अडसड यांनी दिली
येथील नगरपरिषद भवन येथे दर मंगळवारी कामगारांना स्वयंपाकपयोगी
साहित्याचे संच मिळणार आहे पहिल्या टप्प्यात आज अडिचशे बांधकाम कामगारांना प्रेशर कुकर, गंज, ताट, वाट्या, ग्लास, चमचा आदी स्वयंपाकपयोगी साहित्य संचाचे वितरण आ प्रतापदादा अडसड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा शहराध्यक्ष मोहन गावंडे, अशोक शर्मा विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष उषा तीनखेडे, नलिनी मेश्राम , यांची उपस्थित होती राज्य शासन कामगारासाठी विविध योजना राबवतात या योजना सर्वसामान्य पर्यंत आता पोहोचायला लागल्या आहे केवळ पेटी व स्वयंपाक उपयोगी साहित्य संच पर्यंत ही योजना मर्यादित नाही आरोग्य, शिक्षण, कामगारांच्या कुटुंबांना लाभ देणारी ही योजना आहे तिन्ही तालुक्यात बांधकाम कामगार मदत केंद्र उघडण्यात आले असून
कोणत्या एजंट कडे न जाता या केंद्रातून आपण लाभ घ्यावा असे आवाहन आमदार प्रताप अडसड यांनी केले यावेळी भाजपा कामगार आघाडीचे विदर्भ सरचिटणीस अमोल पोहेकर, संजय देशमुख, पवन पडोळे न प चे कनिष्ठ अभियंता प्रदीप सहारे, जयपाल बांनते यांची उपस्थिती होती