संविधान स्पर्धा परीक्षेचा बक्षीस सोहळा संपन्न

0
1
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे/ प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी संघटनेद्वारा आयोजित 1000 विद्यार्थ्यांनी दिलेल्या संविधान स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला प्रस्तुत कार्यक्रमाचे मार्गदर्शक ई.झेड. खोब्रागडे साहेब निवृत्त सनदी अधिकारी भारतीय प्रशासन सेना नागपूर हे होते ,तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा.गौतम सनकाळे यांनी भूषविले व प्रमुख अतिथी म्हणून प्रा.प्रमोद हातेकर होते प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.विलास पाटील यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय सुरेश वानखडे सर यांनी दिला व आभार प्रदर्शन सुरेंद्र मनोहर यांनी केले.

संविधान स्पर्धा दोन गटात म्हणजे आठ ते बाराचा पहिल्या गटामधून प्रथम क्रमांक कुमारी साची बाबुलाल खडसे चंद्रभागाबाई पाकोडे विद्यालय मंगरूळ दस्तगीर व गायत्री नारायण गायकवाड आयटीआय कॉलेज धामणगाव यांना प्रत्येकी तीन हजार रुपयाचे पारितोषिक मिळाले ,द्वितीय क्रमांक गौरी दिनेश नागोसे सेफला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय धामणगाव रेल्वे रुपये 2000 ,तृतीय क्रमांक तन्मय नरेश सातपुते आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे रुपये 1000 प्राप्त केले आणि दुसऱ्या महाविद्यालयीन गटामध्ये आतिश किसनराव सुटे व अक्षय गोसावी यांना दोन हजार रुपयाचे पारितोषिक विभागून दिले तर तृतीय क्रमांक आशिष बनसोड 1000 रुपये राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका धामणगाव रेल्वे यांना मिळाले प्रोत्साहन पर पारितोषिक विधीशा सिद्धार्थ रामटेके हिराबाई गोयंका कन्या विद्यालय धामणगाव रेल्वे,पूर्वी अवचित खडसे स्वर्गीय नंदलाला कन्या विद्यालय धामणगाव रेल्वे, दीरविराज प्रशांत शेलोकार छत्रपती हायस्कूल धामणगाव रेल्वे , प्राची महादेव मेश्राम स्वर्गीय संतोषराव गोळे कन्या शाळा मंगरूळ दस्तगीर ,संस्कृती अतुल बंड कान्होजी बाबा विद्यालय अंजनसिंगी ,नंदिनी हिम्मत इंदोरे ,साईबाबा विद्यालय अंजनसिंगी ,आकांक्षा संतोषराव कुईटे माध्यमिक कन्या विद्यालय तळेगाव दशासर ,यश महेंद्र नाईक जिल्हा परिषद माध्यमिक शाळा तळेगाव , श्रावणी दिनेश वंजारी श्री देवराव ठाकरे विद्यालय अशोक नगर, कुमारी शिवानी चन्ने शासकीय निवासी शाळा हिंगणगाव, ऋषाली राहुल लढे डॉक्टर मुकुंदराव पवार शाळा जुना धामणगाव यांना प्रत्येकी पाचशे रुपयाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील सर्व सहभागी शाळेतील मुख्याध्यापकांचा मोमेंटो व रोपटे देऊन गौरव करण्यात आला माननीय खोब्रागडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय अधिकारी होऊन मोक्याच्या जागा मिळवून समाजसेवेचे आवाहन केले तर प्रकाश कांबळे वर्धा यांनी ‘आम्ही भारताचे लोक’ हा एक पात्री प्रयोग करून प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणाकरता प्रा शत्रुघ्न गोसावी, प्राध्यापक डॉ जगदीश हेंडवे, विनय खाकसे प्रशांत फुले, रणजीत बेले, प्राध्यापक गणवीर, अशोक वाघमारे ,विनय खाकसे, संजय श्रीरामे , ईश्वरदास बागडे ,अलका डोंगरे, रंजना हातेकर ,कल्पना हेंडवे यांनी देऊन मोलाचे सहकार्य केले .प्रस्तुत कार्यक्रमाचे संचालन रंजना हातेकर व सौ अलका डोंगरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर नगराळे, टेंभुर्णे यांनी अथक प्रयत्न केले.

veer nayak

Google Ad