काँग्रेस पक्षाला दिग्गज पाच उमेदवारांची अध्यक्षपदासाठी उमेदवारीची मागणी
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : नगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस २५ जागेवरही आपले उमेदवार उभे नगराध्यक्ष पदाचा दावेदारही काँग्रेसचाच. पत्रकार परिषदेत अनंत बाबुजीदादा मोहोड यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती
आर्वी शहरातील नगरपालिकेच्या होवु घातलेल्या निवडणुकीत २५ पैकी २५ जागेवरही उमेदवार काँग्रेस पक्षाच्या पंजा या चिन्हावर उभे राहणार असुन मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा वर्ग आर्वी शहरात असल्याने या निवडणुकीत मोठ्या संख्येने यश प्राप्त होईल अशी आशा पत्रकार परिषदेत काँग्रेस कमेटीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव अनंत बाबुजीदादा मोहोड यांनी व्यक्त केली.
आज दुपारी ४ वाजता काँग्रेस कमेटी संपर्क कार्यालयात गांधी चौक नाग मंदिराजवळ झालेल्या पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी संवाद साधत असतांना बोलत होते.
काँग्रेस पक्ष हा जुना पक्ष असुन काँग्रेस पक्षामध्ये कोणत्याही जाती भेदाला थारा नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने उमेदवारासाठी युवक वर्ग व इतर काँग्रेस कार्यकर्ते पुढे आले आहे. या संदर्भातील सर्व नांवे पक्षाकडे आलेले आहे. काँग्रेस कमेटीचे महासचिव अनंत बाबुजीदादा मोहोड पत्रकारांशी संवाद साधतांना म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये १३ जिल्हा परिषद व २६ पंचायत समितीच्या लढत असुन कार्यकर्त्यांचे अर्ज पक्षाकडे आलेले आहे. सर्व निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या कार्यरत सरकारच्या अपयशामुळे शेतकरी वर्ग, मजुर, बेरोजगार, ठेकेदार हतबल आणि निराश झालेले आहे. अजुनपर्यन्त शेतकऱ्यांची कर्ज माफी व पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई सुध्दा शेतकऱ्यांना प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेलेली आहे. त्यामुळे नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक आम्ही प्रभावीपणे लढु व जिंकु असा निर्धार मी याप्रसंगी व्यक्त करतो.
या पत्रकार परिषदेला वर्धा जिल्हा काँग्रेस कमेटी उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर जोरे, आर्वी ब्लॉक काँग्रेस कमेटी अध्यक्ष श्री. चंद्रशेखर वनस्कर, आर्वी शहर अध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकर भुयार, शुभम नागपुरे, अक्षय निस्ताने, प्रज्ञा मांडवकर, कैलास अवथळे, हिरालाल राठोड, शुभम काळे, मोहित राउत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
















