बालकलाविश्वाचा रंगीबेरंगी उत्सव; खरबी (मांडवगड) जि. प. शाळेत स्नेहसंमेलनाची धमाल .सांस्कृतिक कार्यक्रमात १३२ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे (ता. प्र.)

शाळेचा प्रांगण, रंगीबेरंगी पोशाख, चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि टाळ्यांचा कडकडाट… अशा उत्साही वातावरणात चांदूर रेल्वे तालुक्यातील खरबी (मांडवगड) येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या दिमाखात पार पडले. या स्नेहसंमेलनात इयत्ता पहिली ते सातवीच्या एकूण १३२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपली कला सादर केली.

कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रावण सलामे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सतीश देशमुख, राजुभाऊ नेरकर, शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन जुनघरे, घुईखेड केंद्राचे केंद्रप्रमुख रामदास भाग्यवंत, अजय साव आदी उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य मतीन शहा, अजय औंधकर, विजय बावणे, गजानन मरस्कोल्हे, विजय बिजुलकर, गजानन गुजर, पवन गावंडे, चंद्रशेखर खोडके, विनोद शामकुवर, पंकज गोंडाने, अनिसखा पठाण, रुपाली बावणे, माया ठाकूर, कविता सोनबावणे, शिल्पा ठाकूर, सुनिता ढेंबरे, दुर्गा सोनबावणे, पूनम गुजर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात “उदे ग अंबाबाई” या गीताने झाली. त्यानंतर देशभक्तीपर गीते, गोंडी नृत्य, भीमगीत, “गेली माझी सखी बायको गेली” ही नाटिका, शिवबा गीत, सिनेमावरील रिमिक्स गीते, फॅन्सी डान्स, शेतकरी गीत अशा विविध प्रकारच्या एकूण ३५ नृत्य व सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमास उपस्थित प्रेक्षक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त दाद देत रोख बक्षिसे, खाऊ व शालेय उपयोगी साहित्य देऊन त्यांचे कौतुक केले. मंडप सजावटीसाठी विनोद बावणे यांचे विशेष सहकार्य लाभले. या स्नेहसंमेलनाचे उत्तम नियोजन शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन जुनघरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललिता नवघरे यांनी केले, तर नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी दिपाली जाधव यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक प्रभाकर तितरे, मनोज वानखडे व कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी ग्रामस्थांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

मुख्य संपादक राजू गायकवाड

Google Ad