चांदूर रेल्वे – मतदानाचा उत्साह

0
14
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अशोक महाविद्यालय मतदान केंद्रावर पांडुरंगी स्वर्गीकर काकांची उपस्थिती

अशोक महाविद्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर आज सकाळपासून मतदारांची रांग लागलेली दिसत आहे. त्याच दरम्यान चादूर रेल्वे शहरातील ज्येष्ठ नागरिक पांडुरंगी स्वर्गीकर काका मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्राकडे जाताना दिसले.

लोकशाहीतील प्रत्येक मताची ताकद अधोरेखित करत स्वर्गीकर काकांनी “मतदान हा आपला हक्कच नव्हे तर कर्तव्य आहे,” असा संदेश दिला. ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह पाहून इतर मतदारांनाही प्रेरणा मिळत असून केंद्रावर शांततेत आणि सुरळीत मतदान सुरू आहे.

निवडणूक प्रक्रियेला नागरिकांचा असा प्रतिसाद मिळत असल्याने प्रशासन समाधान व्यक्त करत आहे.

veer nayak

Google Ad