चांदुर रेल्वे तालुका प्रतिनिधी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीगृह चांदुर रेल्वे येथे वस्तूगृहा मध्ये राहत असलेल्या मुलांचे गैरसोय होत असल्याचे तक्रार स्थानीय कर्मचारी गणेश मेंढे यांनी अमरावती जिल्हाधिकारीसह समाज कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य हो उपायुक्त समाज कल्याण विभाग अमरावती यांच्या कडे केली आहे.
Sadar वस्तीगृहामध्ये राहत असलेल्या मुलांना पोटभर अन्न न देणे, शासकीय नियमाप्रमाणे मिळत असलेल्या शेफ, अंडे, दूध, तूप, फळे न देता तासअन तास उपाशी ठेवत विद्यार्थ्यावर अन्याय होत असल्याचे चित्र सध्या वस्तूगृहात दिसत आहे.
चांदुर रेल्वे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुला मुलींचे वस्तुगृह असून यामध्ये गोरगरीब जनतेचे मुले शिक्षण घेण्यासाठी राहतात. परंतु वस्तूगृह अधीक्षक हे स्वतः वस्तूगृहामध्ये राहत नसून मुख्यालयी राहत नाही.
यामुळे सदर वस्तूगृहातील मुलांना आरोग्य,स्वच्छता व नियमित मिळणारे जेवण, नास्ता हा नियमाने मिळत नसून त्यांच्यावर दररोज अर्धपोटी उपाशी राहण्याची वेळ येत आहे. अस्या या खाण्या पिण्याच्या गैर सुई मुळे विद्यार्थी शारीरिक व मानसिक कमजोर होत असून वस्तूगृह अधीक्षक यांच्या दबावाखाली कुठेही याबाबत वाचता करीत नाही. सदर शासनाच्या नियमावर विद्यार्थ्यांनी विचारले असता वस्तूगृह अधीक्षक असा कुठलेही प्रकारचा जीआर नाही असे विद्यार्थ्यांना सांगतात.
वस्तूगृह अधीक्षक यांच्या अशा वागण्यामुळे वस्तूगृहातील सुरू असलेल्या भोंगळ कारभारात यांचेही हात ओले असल्याचे बोलल्या जात आहे. कारण सदर अधीक्षक यांच्या मनमानी कारभारामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तर या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याकडून अधीक्षक स्वतःची गाडी धुणे व इतर वैयक्तिक कामे करून घेतात जे त्यांच्या कामकाजाच्या सूचीमध्ये येत नसलेले कामे करून घेतले जातात. जर कोणी अधीक्षक यांना याबाबत विरोध केला तर अधीक्षक त्यांच्या संबंधित कंपनीकडे तक्रार करून त्यांना कामावरून काढण्याच्या धमकी देतात. अशा या हिकेखोरपणाच्या वागणुकीमुळे गोरगरीब विद्यार्थ्यांचे नुकसान तर होतच आहे तर यांची तक्रार स्थानिक कर्मचारी गणेश मेंढे यांनी सचिव सामाजिक न्याय विभाग मुंबई अमरावती जिल्हाधिकारी आयुक्त समाज कल्याण अमरावती,यांच्या कडे करून न्यायाची मागणी करून अधीक्षक निलेश वाडेकर यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
Home आपला विदर्भ अमरावती चांदुर रेल्वे मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तूगृहात मुलांची गैरसोय वस्तूगृह अधीक्षक यांचा...