BREAKING NEWS | अंजनशिंगी प्रकरणात नवा खुलासा

0
10
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अंजनशिंगी गावातील दलित वस्ती सुधार योजनेतील भ्रष्टाचारावरून आता नवीन माहिती समोर आली आहे.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी केलेल्या आरोपानंतर ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनीच पडघान यांना फोन करून कंप्लेंट मागे घ्या, अशी विनंती केल्याचा दावा समोर आला आहे.

 

कॉल रेकॉर्डिंग व्हायरल 

या कॉलमध्ये
➡ “तुम्ही तक्रार मागे घ्या”
➡ “सोशल मीडिया वरचे व्हिडिओ काढा डिलीट करा

अशी विनंती उपसरपंचांच्या वतीने करण्यात आल्याचे ऐकायला मिळत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

प्रश्न निर्माण

ग्रामपंचायतच का विनंती करते?
उपसरपंच यांनी कोणाच्या म्हणण्यानुसार कपिल पडघान यांना कॉल केला?
तक्रार मागे घेण्याचा दबाव का?
जर काम योग्य असेल तर मागे घेण्याची गरज काय?

यामुळे प्रकरण अधिक गंभीर झाल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.

पडघान यांचा आरोप कायम !

या प्रकरणात आधीच
सरपंच, ग्रामसेवक आणि ठेकेदार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.

आता उपसरपंचांचा फोन या प्रकरणाला आणखी नवं वळण देत आहे.

प्रशासनाची प्रतिक्रिया ?

या संपूर्ण प्रकरणी
➡ जिल्हा प्रशासनाची
➡ पोलिस प्रशासनाची
➡ ग्रामविकास विभागाची
अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

“या कॉल रेकॉर्डिंगच्या सत्यतेची पडताळणी प्रशासन करणार का? संबंधितांवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.”

veer nayak

Google Ad