धामणगाव रेल्वे,
श्री राम कथेची सांंगता,श्री हनुमान जन्मोत्सव आणि महाआरती आयोजनाच्या उपरोक्त मंगलमय प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विजय माणिकलाल मुंधडा, उपाध्यक्ष बाबाराव टाले, सचिव सतीश वऱ्हाडे ,अरुण टाले, सह श्रीक्षेत्र दिपोरी व परिसरातील हजारो बंधू-भगिनी भक्त उपस्थित होते
नगराध्यक्ष रोठे यांचे सुवासिनींनी तसेच बेबी देवीदास टाले व सावित्रीबाई फुले ग्राम संघ अध्यक्षा सारिका गोविंद वऱ्हाडे यांनी ग्रामपंचायतर्फे स्वागत केले


…………………………….

त्याग आणि समर्पणातून मंदिर उभारणी…
श्री क्षेत्र दीपोरी येथे एकेकाळी छोट्याशा शेडमध्ये मंदिर होते परंतु धामणगाव रेल्वे येथील श्री मारोतीरायांचे परमभक्त माणिकलाल मुंधडा हे दैनंदिन धामणगाव वरून दिपोरी येथे जात आणि ते मारोती मंदिरात घडलेल्या चमत्काराची प्रचिती ते सांगत त्यामुळे दिपोरी आणि परिसरातील भक्तांना सुद्धा या ठिकाणी चमत्काराची प्रचिती झाली
माणिकलाल मुंधडा यांनी गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांना मंदिर उभारणी करीता पैशाची मागणी न करता दरवर्षी उत्पन्न झालेल्या शेतातील उत्पन्नामधून काही भाग तुरी, सोयाबीन व कापूस हा मंदिराला समर्पण करावा असे आवाहन केले आणि परिसरातील लोकांनी सुद्धा या आवाहनाला समर्थन करून आपल्या उत्पन्नाचा काही भाग देण्यास सुरुवात केली विशेषता आज ही ही परंपरा शुरू आहे सदर सर्व वस्तू लिलाव करून यातून मिळालेल्या पैशातून सदर मंदिराची उभारणी करण्यात आली त्यामुळे आज मंदिराला त्याग व समर्पणातून भव्य आणि दिव्य असे रूप प्राप्त झालेले आहे या भव्य आणि दिव्य रूपाला साक्षातात उतरविणारे वैकुंठवासी माणिकलाल मुंधडा यांची मूर्ती सुद्धा मारोतीरायाच्या अगदी समोर गावकरी द्वारा उभारण्यात आलेली आहे हे येथे उल्लेखनीय माणिकलाल मुंधडा यांच्या निधनानंतर ट्रस्टचे कामकाज त्यांचे चिरंजीव विजय मुंधडा दिपोरी येथील ग्रामस्थांसोबत सांभाळीत आहे.
………………………….
भव्य दिव्य महाप्रसाद..
उपरोक्त प्रसंगी श्री क्षेत्र दिपोरी येथे परिसरातील हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला














