या आधी राष्ट्रवादी कडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आर्वी विभागाच्या मुर्दाळ कारभारा ची मय्यत काढण्यात आली होती
म. जी. प्रा आर्वी कार्यालयात दिलीप पोटफोडे यांनी मुंडन करत आज दसवा केला, 4 दिवसात पाणी प्रश्न सुटला नाही तर – तेरवी करण्याचा इशारा देण्यात आला.
आर्वी : दिनांक 14/05/2025 रोज बुधवारी सायंकाळी चार वाजता आर्वी येथे अजित दादा पवार विचाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आर्वी विधानसभा दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात आर्वी शहरातील नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जाजूवाडी येथील कार्यालयात धडकले अचानक आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व नागरिकांना पाहून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांची दानादाण उडाली, यावेळी दरवेळी प्रमाणे उपविभागीय अभियंता कर्तव्यावर नसून नेहमीप्रमाणे गायब होते.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे, ऍड विशाल पुजारी,आर्वी तालुका अध्यक्ष अशोकराव धानोरकर, शहर अध्यक्ष दिलीपराव बोरकर, महिला जिल्हा उपाध्यक्ष शुभांगी कलोडे, आर्वी शहर कार्याध्यक्षा दीपा वाकोडे, यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अजून उपाययोजना का झाली नाही, याबाबत विचारणा केली, तसेच किती दिवसात पाणी प्रश्न सोडवणार आहात, तुम्हाला प्रेमाची भाषा समजणार नाही का, अशा तीव्र भावना व्यक्त केल्या, यावेळी कनिष्ठ अभियंता इंगळे यांनी पाणी समस्या निकाली काढण्यासाठी, आवश्यक असलेल्या साहित्याची, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरन विभागाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे,तसेच लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या कार्यालयात मुंडन करून, यापूर्वी काढलेल्या मयत आंदोलनाचा दुसरा भाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग आर्वीचा दसवा करण्यात आला, तसेच येत्या चार दिवसात पाणी प्रश्न सुटला नाही तर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग आर्वी, याची तेरवी करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला,
यावेळी उपस्थित नागरिकांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सैनिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या दुर्लक्षित भ्रष्टाचारी कारभाराबाबतीत अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला, यावेळी प्रामुख्याने सीमा डहाके,ज्योती डोलकर,मोनाली खडसे /लांडगे, शिल्पा इखार, स्वाती कुणाल माकोडे,सुरेंद्र वाटकर, सिद्धार्थ कळंबे,समीर अन्सारी, अब्बास शब्बीर बोहरा, तसेच श्रीहरी कॉलनी, जनता नगर, नेताजी वॉर्ड, राष्ट्रसंत वॉर्ड, मायबाई वॉर्ड, मातंग वस्ती, स्टेशनं वॉर्ड, आंबेडकर वॉर्ड, संजय नगर, हनुमान वॉर्ड, मेहर नगर,महाराणा प्रताप वॉर्ड,पंचवटी वॉर्ड चे नागरींक मोठया संख्येने उपस्थित होते