आदर्श गावाची मार्गदर्शिका म्हणजे ग्रामगीता – तुलसीदास झुंजुरकार

0
7
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

पिंपळखुटा : मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाच्या अंतर्गत ग्रामपंचायत पिंपळखुटा येथे व्याख्यानाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. “गाव हा विश्वाचा नकाशा – समृद्धीचा संकल्प” या विषयावर बोलताना आदर्श गाव घडवण्यासाठी सर्वप्रथम आदर्श कुटुंब आवश्यक आहे. आदर्श कुटुंब घडण्यासाठी आदर्श व्यक्ती हवी असून, त्या आदर्श व्यक्तीची सुरुवात ही स्वतःपासून झाली पाहिजे, जोपर्यंत गावातील सर्व नागरिक व तरुण संघटित होऊन संविधानिक जबाबदारीने कार्य करत नाहीत, तोपर्यंत शासनाच्या कितीही ग्रामविकासाच्या योजना असल्या तरी खऱ्या अर्थाने आदर्श व समृद्ध गाव निर्माण होऊ शकत नाही. गावाचा नागरिक म्हणून जर आपण कार्य केले, तर गाव आदर्श झाल्याशिवाय राहणार नाही.

सध्या शासनाने नव्याने सुरू केलेल्या ५० टक्के सवलतीने कर भरण्याच्या योजनेचा लाभ घेत सर्व नागरिकांनी कर भरावा व करमुक्त गाव करण्यासाठी पुढाकार घ्यावा, आजपर्यंत जे जे गाव आदर्श झाले, त्या सर्व गावांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ‘ग्रामगीता’ ही मार्गदर्शक ठरली आहे. त्यामुळे ग्रामगीता वाचून तिचे विचार केवळ ऐकून न थांबता प्रत्यक्ष कृतीत आणावेत, असेही त्यांनी सांगितले प्रतिपादन श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल येथील युवा व्याख्याते तुलसीदास यांनी केले.

या कार्यक्रमाला सविच पल्लवी रंगारी मॅडम, सरपंच दिलीप राऊत, उपसरपंच पद्मा मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य वैभव ढाणके, रूपाली चांबट, रुद्रकार रवी उगले, शेषराव उके, टांगेल काकू, शेंडे ताई, तसेच तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद घोडके, पोलीस पाटील गायके ताई, सामाजिक कार्यकर्ते सुरज गंथडे, अंगणवाडी सेविका व मदतनीस, गावातील शिक्षकवर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

veer nayak

Google Ad