माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था व महिला मंडळ तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई जयंती साजरी

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे

माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था धामणगाव रेल्वे व महिला मंडळ धामणगाव रेल्वे यांच्याकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली .

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार अभय घोरपडे हे व स्स्नेहल शेळके, तसेच माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक दिलीप दगडकर व अध्यक्ष हरीश मलवार , वर्षा दारवेकर , सविता वैद्य हे मान्यवर मंचावर उपस्थित होते .

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन माधुरी ठाकरे प्रस्तावना कांचन रेवाडे व स्वागत गीत वर्षा दिलीप दगडकर यांनी सादर केले.

या कार्यक्रमाकरिता मोठ्या संख्येने माजी सैनिक व महिला मंडळ सदस्य हजर होते, सविता वैद्य , प्रणिता पडोळे, सौ वर्षा दरवेकर , माधुरी ठाकरे , कांचन रेवाडे, रजनी भेंडे, श्रीमती प्रमिला भगत, वंदना सोनवणे, श्रीमती कैकाडे श्रीमती लता भांडारकर ,देशमुख , योगिता इंगळे, ढाणके, पूजा बुटले, रामदासजी हाडे , शिवचंद्र देशमुख , राहुल कुकडे , दशरथ ठोंबरे , श्रावणजी चव्हाण , रामेश्वर शेंडे , नरेश इंगळे , दिनेश ठाकरे ,सुनील राऊत, अशोक देवरकर, सुभाष दोयपरे, पुंडलिक कडव , जगदीश महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने माजी सैनिक हजर होते.

veer nayak

Google Ad