आर्वी शहरातून गेलेला नॅशनल हायवे रोड केव्हा घेणार मोकळा श्वास ?
आर्वी, ता. प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : येथील अनेक दिवसापासून रखडलेला आर्वी शहरातून गेलेला तळेगाव व पुलगाव मार्ग राेड महाराष्ट्र ते मध्यप्रदेशला जोडलेला रस्ता आहे मुलताई,वरोरा असा आर्वी शहरातून जाणारा मार्ग हा केव्हा मोकळा श्वास घेईल असा आर्वी शहरातील प्रत्येक नागरिक कित्येक वर्षापासून आतुरतेने वाट पाहत आहे. हा रोड नियमानुसार पूर्ण हाेईल का? अशी सुद्धा आर्वीकर नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मध्यंतरी आर्वी शहरामध्ये एक हा रोड चांगला व नियमानुसार व्हावा याकरिता संघर्ष समिती स्थापन करण्यात आली हाेती. आर्वीकर नागरिकांनी त्या समितीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद सुद्धा दिला आता हा रोड नियमानुसार करून घेतल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही संघर्ष समितीच्या अध्यक्षांनी सुद्धा दिली व बंद पडलेले काम लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा सुरू झाले निवडणुका संपल्या पुन्हा रोडचे काम बंद झाले पुन्हा विधानसभेच्या निवडणुका आल्या पुन्हा थातूरमातूर काम सुरू झाले निवडणुका संपल्यावर पुन्हा कामाला गती आली रोडच्या कामाची आलेली गती व तत्परता पाहून पुन्हा असं वाटायला लागलं रोड आता नियमानुसार पूर्णत्वास जाईल अशी तत्परता पाहून आनंदाचे वातावरण सुद्धा निर्माण झाले परंतु ज्या तत्परतेने केंद्र शासनाच्या नियमानुसार नॅशनल हायवे 347-A रोडच्या मधात येत असणारे मंदिर याचं मोठ्या तातडीने पुनर्वसन करण्यात आलं परंतु आर्वी येथील रोडच्या मधात येत असलेले अतिक्रमण अजूनही जसच्या तसे दिसून येत आहे. याला शासन जबाबदार की आर्वीतील भरघोस मतांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जबाबदार हे समजायला मार्गच नाही. या रोडचे काम सुरू असताना आर्वीतील कित्येक निष्पाप व्यक्तींचे जीव गमवावे लागले आहे. अनेक नागरिकांच्या घरचे निष्पाप व्यक्तींचे गेलेल्या जीवांच्या वेदना या रोड मध्ये दडलेल्या आहे. या रोडची शासन दखल घेतील का? व लोकप्रतिनिधीला जाग येतील का? हा रोड केव्हा नियमानुसार पूर्ण हाेईल याकडे सर्व आर्वी तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
—————————————-
प्रतिक्रिया
एखाद्या व्यक्तींचा रोडवर अपघात होतो त्या व्यक्तीचे दुःख त्यालाच कळते जेव्हा आमच्याकडे अपघात झालेले पेशंट येतात अपघात झालेल्या घरच्या त्या संबंधित व्यक्तींचा जीव जागेवर राहत नाही. अनेक पेशंट आम्ही पाहतो अपघात झालेल्या पेशंटला हॉस्पिटलला आणता आत्ताच जीव गमावा लागतो यदा कदाचित पेशंटचा जीव वाचवण्यात आम्हाला यश आलं तर हाता पायाने जर त्याला अपंगत्व आलं तर त्याच आयुष्यच संपल्यासारखं होतं म्हणून त्याकरिता मुख्य शहरातून रोड हा ४ पदरी व रुंदी नियमानुसार व्हायला पाहिजे आणि येणारा जाणारा मार्ग हा वेगळा व रोड रुंदीला मोठा झाला तरच अपघाताचे प्रमाण कमी होतील..!
डॉ. राेशन जवळेकर (जवळेकर हॉस्पिटल, आर्वी) हुदयरोग तज्ञ
——————————————–
प्रतिक्रिया
माझे याच रोडवर घर आहे अपघात झाल्यावर काय वेदना सहन करावे लागते याची मला पुरेपूर जाणीव आहे माझा याच रोडवर अपघात झाला होता व कित्येक महिने मला अपंगत्व व वेदना सहन कराव्या लागल्या मी माझ्या साईडला जात असताना एका दुचाकी गाडी माझ्या पायावर येवुन धडली व मला अपंगत्व कित्येक दिवस सहन कराव लागलं येणारा जाणारा मार्ग हा जर वेगळा असता तर माझा अपघात झाला नसता. तसेच येणारा जाणारा मार्ग हा वेगळा असला व रूंदी वाढवली तर अपघाताचे प्रमाण कमी होतील..!
श्रीमती विद्याताई गणेश मेहरे
आर्वीतील भुक्तभोगी महिला
—————————————
प्रतिक्रिया
ज्या विश्वासाने आर्वीतील आर्वी-तळेगाव रोड हा नियमानुसार व्हावा याकरिता संघर्ष समिती स्थापन झाली होती परंतु नॅशनल हायवे रोड प्रॉपर तळेगाव गावातून नियमानुसार झाला.! मात्र आर्वीचा शहरातून जाणाऱ्या रोडचे काम नियमानुसार होत आहे का? यात मात्र शंकाच निर्माण होत आहे. ज्या तत्परतेने धार्मिक स्थळांच पुनर्वसन केलं त्या तत्परतेने रोडवर येत असलेले अतिक्रमण काढून रोड हा नियमानुसार होतील का? अतिक्रमणला हात न लावता रोडची रुंदी तर कमी करत नाही ना? शहरातून जाणारा- येणारा मार्ग हा वेगळा तर पाहिजेच पण वेगळा जरी असला तरी शहरातून जाणाऱ्या रोडची रुंदी जर कमी केली तर अपघाताचे प्रमाण पुन्हा १००% वाढणार..!
सुधीर जाचक
सामाजिक कार्यकर्ता आर्वीतील नागरिक
—————————————–
प्रतिक्रिया
अजून किती दिवस सामान्य नागरिकांना सोसावा लागेल नाहक त्रास या रोडचे वाढदिवस कराव की निष्पाप व्यक्तींच्या तेरव्या
न्याय मागाव तरी कोणाला लोकप्रतिनिधीच्या गळ्यात विजयाचा हार पडला की त्यांना गावाशी प्रेम आहे की नाही याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होते. आमच्या भोलीभाली मायबाप जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला गावाविषयी काहीच वाटत नसेल का? या रोडची रुंदी जर कमी केली. आणि अपघाताचे प्रमाण वाढले तर याला जबाबदार कोण राहील लोकप्रतिनिधीने नॅशनल हायवे रोडच्या संबंधित अधिकाऱ्यांना या रोडचे काम कोणतीही दिरंगाई न करता नॅशनल हायवेच्या नियमानुसार करा असे ठणकावून सांगायला पाहिजे..!
नवल लायच्या… (सराफा व्यावसायिक)
———————————————
प्रतिक्रिया
सात वर्षापासून आर्वीतील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या रोडवर अनेकदा अपघात झाले आहे.
या रस्त्यावर अनेक शाळा, विद्यालय , शासकीय कार्यालय व उपजिल्हा रुग्णालय सुद्धा आहे. हा रोड फार वर्दळीचा असल्यामुळे याच रोडवर कित्येक विद्यार्थ्यांना व सामान्य नागरिकांना अपघाताचा त्रास सहन कराव लागत आहे. तरी येथील लोकप्रतिनिधी गांधारीच्या भूमिकेत तर नाही ना? या बिकट समस्येतून जनता केव्हा मोकळा श्वास घेतील हे चिंताजनकच बाब दीसत आहे. याची शासनाने व लोकप्रतिनिधीने दखल घ्यायला पाहिजे. हा नॅशनल हायवे चा रस्ता असल्यामुळे हा नियमानुसार झाला पाहिजे..!
हाजी सुलेमान (व्यापारी संघटना अध्यक्ष) आर्वी
——————————————–
प्रतिक्रिया
हा नॅशनल हायवे रोड नियमानुसार व्हायला पाहिजे याकरिता संघर्ष समितीने स्वाक्षरी अभियान राबवून सात आठ हजार लोकांच्या स्वाक्षरी नोंदवल्या होत्या त्याचं काय झालं संघर्ष समिती झोपली तर नाही ना? नॅशनल हायवे रोड संबंधित अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना भेटून ठनकावुन सांगायचं काम नाही का? संघर्ष समिती ही या रोड संबंधित जनतेच्या समस्या संबंधित अधिकाऱी व लोकप्रतिनिधीकडे मांडण्याकरिता स्थापन केली होती. तर जनतेचे समाधान करून देणे हे संघर्ष समितीचे काम आहे. हा नॅशनल हायवे रोड आहे नियमानुसारच व्हायला पाहिजे..!
श्री गुणवंत गुल्हाने (सामाजिक कार्यकर्ता) आर्वी
——————————————–