अमरावती – शहरी आरोग्य केंद्र मसानगज अंतर्गत संत कबीर नगर येथे डॉ.विशाल काळे आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी आरोग्य पोषण दिन घेण्यात आला त्यामध्ये शहराचे साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ.रुपेश खडसे यांनी पोषण दिन निमित्त सर्वांनी आपल्या आहारात व्हिटॅमिन अ,ब,क, ड. ई चे स्त्रोत व ते आहारात कसे घ्यावे व त्यांचे फायदे सांगितले तसेच ते न आहारात घेतल्यास होणारे आजार सुध्या सांगितले आपले परिसर स्वच्छ करावे ,एक दिवस कोरडा पाळावा साठलेले स्वच्छ पाणी खाली करावे व डेंग्यू ची उत्पती नष्ट करावी असे जाहीर आवाहन जनतेला केले .
वैद्यकीय अधिकारी डॉ.विक्रांत राजुरकर यांनी टी बी होऊ नये म्हणून परिसरात कोणाला ही दोन आठवड्यात पेक्षा जास्त दिवस खोखला ,भुख मंदावणे वजन कमी होणे , मानिवर गाठ असणे असे लक्षण दिसले की जनतेनी त्याची माहिती शहरी आरोग्य केंद्रात दयावी असे सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल पवार यांनी क्षय दुरीकरण कण्यासाठी शासनातर्फे मिळणाऱ्या प्रोसहानात्मक रुपये पाचशे, हजार, व मोफत उपचार मिळतो असे सांगितले ह्या कार्यक्रमात ज्योती वानखडे , अमोल जांभळे , आरोग्य सेवक नेवाने .लॅब टेक्निशियन विनस धिकार , सौरव साबळे , आरोग्य सेविका प्रतिभा चव्हाण कार्यशेत्रातील आशा वर्कर इत्यादी सर्व कर्मचारी उपस्थित होते .वैद्यकीय अधिकारी यांनी सभेत स्थानिक गरोदर माता , मुल झालेली माता, किशोरवहीन मुली लहान बालके यांना सर्व हिरवे पालेभाज्या ,फळ, शेंगा व जेवणात वापरण्यात येणाऱ्या आहाराची सखोल माहिती दिली व पुढील विषयावर मार्गदर्शन केले. गरोदर मातांची काळजी कशी घ्यावी त्यांना पूरक आहार कसा घ्यावा , वैयक्तिक स्वच्छता कशी ठेवावी व लहान बालकांच्या लसीकरणा बाबत, कुष्ठरोग ,क्षयरोग विषयी माहिती, शुगर- बीपी याबद्दल व लहान बालका मधे मधुमेहा- चे प्रमाण का जास्त झाले ते कमी कसे केले पाहिजे ,एन सी .डी.डे कशा पद्धतीने राबवावे ही माहिती दिली ,परिसरातील लाभार्थ्याची आरोग्य तपासणी बि.पी.शुगर तपासण्यात आली शांततेत मोठ्या संख्येत हा कार्यक्रम पार पाडला.महिलांनी छान प्रतिसाद दिला