बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात आक्रोश मोर्चा. शेकडो युवकांचा सहभाग. दुपारपर्यंत धामणगाव स्वयंस्फुर्त बंद.

0
20
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,
बांगलादेशातील हिंदू संतांवर तेथील सरकार अतोनात अत्याचार करित आहेत बांगलादेश मध्ये हिंदू पूर्णपणे असुरक्षित झालेला आहे तेथील आया बहिणींवर बलात्कार अत्याचार दिवसाढवळ्या करण्याचे कार्य बांगलादेशातील लोक करीत आहेत असुरक्षित असलेल्या हिंदूंना सुरक्षित करण्यात यावे आणि बांगलादेशाचा कठोर निषेध करण्याकरिता मंगळवारी धामणगाव रेल्वे येथे युवकांची आक्रोश रॅली निघाली
सकल हिंदू समाज,बजरंग दल व राष्ट्रीय गोरक्षा मंचाचे शेकडो कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले छत्रपती शिवाजी चौक ते मुख्य बाजार ओळ, गांधी चौक, अमर शहीद भगतसिंग चौक मार्गे रॅली तहसील कार्यालयात पोहोचली या ठिकाणी तहसीलदारांना धामणगाव इस्कॉन चे प्रमुख दिनेश बुधलानी व राष्ट्रीय विचार मंचाचे जिल्हाप्रमुख प्रशांत मून यांच्या हस्ते निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले 


————————– ——–
दुपारपर्यंत प्रतिष्ठाने व दुकाने स्वयंस्फूर्त बंद..
सकल हिंदू समाजाच्या विनंतीवरून धामणगावच्या समस्त व्यापाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून दुपारपर्यंत स्वेच्छेने आपली प्रतिष्ठाणे व दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला
सकल हिंदू समाजाच्या विनंतीला मान ठेवून समस्त धामणगावकरांनी शंभर टक्के दुकाने बंद ठेवलीत त्यामुळे यावेळी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी व्यापारांचे आभार व्यक्त केले


————————————–
बांगलादेशमध्ये सामान्य हिंदूंवर सुद्धा सातत्याने अत्याचार होत आहे.बांगलादेश आता इस्लामी कट्टरतावादाकडे वेगाने सरकत आहे. या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने  भव्य मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला बांगलादेशात सध्या सत्तेवर असलेले मोहम्मद गुनूस यांना  शांततेचे नोबेलही मिळाले आहे. हिंदूच्या कतली करण्यासाठी मोहम्मद युनुस यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे का? असा प्रश्न उपस्थित करून युनुस त्यांचे शांतता नोबेल पुरस्कार परत घेण्यात यावे अशी मागणी सुद्धा करण्यात आली ते सत्तेत आल्यापासून बांगलादेशात हिंदूवर सातत्याने हल्ले होत आहेत असे उल्लेख निवेदनात करण्यात आले

veer nayak

Google Ad