चांदूर रेल्वे
भाजपने देशात तुकडे पाडण्याचे काम केले आहे. जेव्हा जेव्हा धरती वर पाप होऊल तेव्हा तेव्हा नाश होतो जो चांगले काम करेल त्याला फळ मिळेल. कोविड मध्ये जाने मदत केली त्यालाच मत देऊन या वेळी विरोधकाचा बदला घ्या, असे आव्हान तळेगाव द. घुइखेड येथे जाहीर सभेत महाभारतात अर्जुनाची भूमिका बजावणारे फिरोज खान पठाण यांनी केले.
मी मत मागायला आलो नाही मात्र खरी कहाणी सांगयालो आलो आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी लुटण्याचे काम केले आहे. मुसलीम आणि दलितांची मते घेऊन त्यांच्यावर अन्याय करण्याची भूमिका या पक्षाने केली आहे येत्या वीस तारखेला मतदान केले नाही तर पाच वर्ष पच्छातापाची वेळ येईल अल्ला ने हम सब एक है असे सांगितले आहे परंतु भाजपने हिंदू मुस्लीम करून देशाचे तुकडे पाडले आहे. कोविड सारख्या महामारीत डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी मदत केली. कुराण मध्ये हिंदू मुस्लीम लिहिले नाही मग भाजपवाल्यांना हा अधिकार कोणी दिला. त्या मुळे या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून डॉ. निलेश विश्वकर्मा यांना मत देऊन विरोधकांचा बदला घ्या असे आव्हान सिने अभीनेता फिरोज खान पठाण यांनी जाहीर सभेत केले. त्या नंतर डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी आपल्या भाषेत विरोधकानाचा चांगला समाचार घेतला इ निवडणूक फार वेगळी असून विचार धारेवर व्हायची होती परंतु ति होत नाही. पक्षांचे धोरण दोन्ही विरोधकांनी माती मोल केली. अजित पवार घोटाळे बाजाला मोदी च्या माडीला माडी लाऊन बसविले जाते. जनतेने यावर काय विश्वास ठेवावा. मतदार संघात आरोग्यची, शिक्षणाची सोय नाही. शेतकरी व महिलांना भर सभेत काँग्रेस अवाच्छ भाषेत बोलतात काँग्रेस हि मत विकणारी पार्टी आहे विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या मत दिली त्या मुळे त्यांना या निवडनुकीत मतदारांनी हिस्का दाखवावा. तेव्हाच ते सुधरेल शेतकरी व तरुणांशी काही देणे घेणे नाही. हे फक्त कमिशन खोर झाले आहे . त्या मुळे या निवडणुकीत मला निवडून द्या मी यांचा हिशोब घेतो असा खणखणीत इशारा डॉ निलेश विश्वकर्मा यांनी जाहीर सभेत दिला आहे.