धामणगाव रेल्वे,
श्री स्वामी समर्थ केंद्र, न्यू लुनावत नगर येथे आज मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ ला सकाळी १० वाजता चंद्रकांत दादासाहेब मोरे यांचे अमृततुल्य हितगुज व भव्य सत्संग मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे
गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी विश्वकल्यानात्मक राष्ट्रीय उन्नतीसाठी अनेक यशस्वी अभियान राबविले आहेत त्यांची अनुभूती सुद्धा समाजातील सर्वच वर्गातील घटकांनी घेतली आहे त्याच अनुषंगाने आयुर्वेद, अध्यात्म, वास्तुशास्त्र, स्वयंरोजगार, हस्तशास्त्र, ज्योतिष्यशास्त्र, भारतीय अस्मिता व मानवाच्या विविध समस्या इत्यादी सर्व मानवी जीवनाला परिपूर्ण करणाऱ्या बाबींवर गुरुमाऊली चंद्रकांत दादासाहेब मोरे यांचे प्रभावी आणि अमृततुल्य हितगुज व भव्य सत्संग मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे
२०% अध्यात्म आणि ८०% समाजसेवा या उक्तीनुसार श्री स्वामी समर्थ केंद्रांमध्ये सामाजिक उपक्रम राबविले जातात
“संस्कार केले तर सांस्कृतिक टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल” चंद्रकांत दादांच्या या ब्रिद वाक्याला सार्थक करण्याकरिता शहर तथा परिसरातील समर्थांच्या भक्तांसह नागरिक बंधू-भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्र न्यु लुनावत नगर धामणगाव रेल्वे द्वारा करण्यात आलेले आहे