धामणगाव रेल्वे,ता.२०:- विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटल्याने विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानात हिरारीने भाग घेऊन शाळेतील विद्यार्थी गावाची स्वच्छता करताना दिसून येत आहेत. तालुक्यातील सालनापुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे विद्यार्थी परिसराची स्वच्छता करून गावकऱ्यांना स्वच्छतेच्या महत्वाबाबत जनजागृती करताना दिसून येत आहेत.
सालनापूर येथे जि.प. शाळा सालनापूर कडून “स्वच्छ ही सेवा अभियान अंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन .
पंतप्रधान तसेच मुख्यंमत्री यांनी राबवलेली स्वच्छ ही सेवा अभियानार्तंगत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सालनापुर येथे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले . सकाळी सामुहिक स्वच्छतेची शपथ विद्यार्थानी त्याचबरोबर शिक्षकांनी घेतली व शासनाच्या अधिकृत लिंकवर नोंदही करण्यात आली . शाळेत मुलांनी संपूर्ण वर्ग साफसफाई केली . गावात स्वच्छता प्रभात फेरी काढून स्वच्छतेचे घोषवाक्य म्हटले . घराजवळील कचर्याबाबत लोकांना विद्यार्थ्यानी विनंती करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले .मुलांनी घोषवाक्य पट्या तयार केल्या .
शाळेत आणि घरातील टाकावू वस्तुपासून शोभेच्या वस्तु तयार करण्यात आली . कागदापासून विविध वस्तु बनविण्यात आले. भाषणे , चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले.
स्वच्छता पंधरवाड्यात सर्व नागरिकानी सहभाग घेवून आपला गाव परिसर स्वच्छ करण्यासाठी देशकार्यात हातभार लावण्याचे आव्हाहन शाळेकडून करण्यात आले .या कार्यक्रमात शाळेतील व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सदस्यानी सहभाग घेतला .