श्रीगुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार निवासी शिबिराचे उद्घाटन समारोह संपन्न

0
247
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे :–अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी यांच्या तत्वप्रणाली नुसार व श्रीगुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती सलगनित तालुका श्रीगुरुदेव सेवा समितीतर्फे स्व. शकुंतलादेवी राधेश्यामजी लोया यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार निवासी ‘ श्यामली’ शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले।

आजचे सानसान बालक उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील गावाचा देशाचा पांगफेडतील उत्तम उत्तम गुणांनी* या ग्रामगीतेतील ओवी प्रमाणे संस्कार ही काळाची गरज म्हणून श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाला कार्यक्रम अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल यवतमाल प्रमुख उपस्थिती म्हणून श्री रामदास पंत चोरडे गुरुजी श्री विठ्ठल दादा काठोळे श्री सुनील जी वोरा श्री शिवाजीराव पवार सौ राधाताई गोपालजी भूत प्राध्यापिका जया केने कार्यक्रमाला उपस्थित होते

वंदनीय तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज स्वर्गीय शकुंतलादेवी लोया यांच्या प्रतिमेचे पूजन करून संकल्प गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून बौद्धिक तासीके अंतर्गत राष्ट्रीय एकात्मता थोरांचे चरित्र आदर्श दिनचर्या सामुदायिक प्रार्थना सामुदायिक ध्यान प्राणायाम सूर्यनमस्कार लाठीकाठी भजन, संगीत मलखांब ,दानपट्टा अशा विविध विषय शिकविले जाणार आहे या शिबिराला जिल्ह्यामधून 200 विद्यार्थी उपस्थित झाले आहे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे रामदासपंत चोरडे गुरुजी यांनी आपल्या भाषणातून संस्कार ही काळाची गरज आहे आदर्श माता पिता असेल तर कुटुंब आदर्श होते हा देश ऋषीमुनींचा आहे साधुसंतांचा आहे म्हणून त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकून संस्कार अंगीकारणे महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले तर सुनीलजी वोरा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून भारत जागो भारत जागो या गीताने राष्ट्र जागृती केली कार्यक्रमाचे उद्घाटिय भाषणात डॉ. सूर्यप्रकाशजी जयस्वाल म्हणाले या सुसंस्कार शिबिरातील संस्कार हे मरेपर्यंत कायम राहते व व्यक्तीचे जीवन आदर्श होते म्हणून या शिबिरासारखे शिबिरं दरवर्षी होणे ही काळाची गरज आहे यानेच आपला देश सुधारेल या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक रावजी इंगळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन प्रतीक ब्राह्मणकर यांनी केले या शिबिऱ्याच्या व्यवस्थापनासाठी विट्ठालदादा काथोडे, गोपाल भूत ,रवी चौधरी रमेश दादा ठाकरे ,अरुणराव गरड ,रवी कडू ,दीपक राव इंगळे, गजानन भेंडे ,गोविंद कपिले संजय वर्मा ,गजानन उपरीकर सुरेशराव ठाकरे, प्रदीप गोपाळ अरुण ठाकरे इत्यादी मंडळी व्यवस्थापन करीत असून शिबिराचा महत्त्वाचा शिक्षक प्रशिक्षक वर्गामध्ये मुख्य शिक्षक म्हणून ग्रामगीताचार्य निलेश मोहकार उपशिक्षक ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे प्रशांत टांगले ,कृष्णा शेंडे विजय ठाकरे ,शुभम जुनघरे शुभम सगळे ,सागर ठाकरे, चेतन बोरकर ,सचिन धांदे, समीर कळसकर ,प्रतीक ब्राह्मणकर ,ऋषभ झोटिंग इत्यादी प्रशिक्षक शिक्षक मेहनत घेत आहे.पालक वर्ग सुद्धा मोठ्या उत्साहाने हजर होते।

संस्कारातून नव पिढी घडत आहे हाच राष्ट्रसंतांचा संदेश म्हणून ग्राम जयंती निमित्ताने या शिबिराचे उद्घाटन आनंदात संपन्न झाले

veer nayak

Google Ad