भाई अमन यांच्याकडून सुरु असलेल्या भोजन सेवेला ५ वर्ष पूर्ण.

0
2

यवतमाळ प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षांपासून अनेक सामाजिक उपक्रम राबवून भाई अमन यांनी समाजसेवी म्हणून नावलौकिक केले आहे. आजवर भाई अमन यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवित अनेकांना मदत केली आहे अशाच प्रकारे भाई अमन यांनी शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी तसेच यवतमाळ शहरातील कामगार चौक येथे गवंडी काम करणाऱ्या कामगारांकरिता भोजनदानाची सेवा सुरू करून या सेवेला ५ वर्षे पूर्ण झालेले असून ही सेवा अशीच अविरत सुरू राहील असेही भाई अमन यांनी सांगितले. या सेवेच्या व्यतिरिक्त अत्यंत गरीब कुटुंबाच्या मुलींकरिता विवाहाला लागणारा जीवनाचा खर्च तसेच जीवनावश्यक वस्तूंची किट आजवर शेकडो मुलींच्या लग्नाकरिता वितरित केली इतकेच नव्हे तर कोरोनाच्या कार्यकाळात भाई अमन यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कोरोनाग्रस्तांना, गरजवंतांना अनेक सेवा पुरविल्या याव्यतिरिक्त शासकीय रुग्णालयात भाई अमन यांचे कडून भोजनाचा वाटप सुद्धा त्यावेळी करण्यात आले. यवतमाळ शहरातच नाही तर जिल्ह्यात कुठलेही आपत्कालीन संकट ओढवले त्या संकटातही खंबीरपणे भाई अमन यांनी प्रशासनासह गरजवंतांना नेहमीच मदत पुरविली आहे. याचप्रमाणे सदैव अशाच प्रकारे मदतीसाठी तत्पर राहणार असल्याचे भाई अमन यांनी सांगितले.

veer nayak

Google Ad