प्रती,
स.मा.गटविकास अधिकारी साहेब,
पंचायत समिती धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती.
महोदय,
आपणांस या प्रश्नाव्दारे विनंती करतो की,आपण वरुड बगाजी व इतर घरकुल लाभार्थीच्या अडचणी बाबतीत लक्ष द्यावे ही नम्र विनंती.
साहेबजी आपण वरुड बगाजी प्रकरणात आपल्या लक्षात येईल की, प्रस्ताव घरकुलचा केव्हा दाखल केला व त्या वर कारवाई कीती दिवसात करणे गरजेचे आहे. व पंचायत समितीच्या कर्मचारी या बाबतीत किती सतर्क आहे हे आपण घरकुल चे कार्यभार सांभाळणारे GO Tack करणारे असो की गावचा ग्रामसेवक असो या सर्व बाबतीत खाते निहाय चौकशी करणे गरजेचे आहे.कारण ग्रामसेवक ने प्रस्ताव घरकुल दिला म्हणजे जबाबदारी संपली नाही ? साहेबजी ! आपल्या शासन निर्णयानुसार आपण ग्रामसेवकची व इतर कर्मचारी बाबतीत दर महिन्याला पंचायत समितीच्या कामकाजा बाबतीत आढावा घेतोय त्या बाबत नोंद वही सुद्धा असणं आवश्यक आहे.त्या नोंद वही मध्ये वरुड बगाजी घरकुल लाभार्थीच्या अडचणी बाबतीत कोणी चर्चा केली का ? हे सुद्धा तपासणी करणं गरजेचं आहे.
तसेच लाभार्थी तक्रार करते,मग प्रकरण काय यांची चाचपणी केल्या जातात हि बाब खेदजनक आहे.साहेब या प्रकरणात आपला संबंध नाही असे आपण आता नव्याने रुजू झालेले असल्याने समजायला हरकत नाही.परंतु आपल्या लक्षात आल्या नंतर आपण सुद्धा ज्या पद्धतीने प्रकरण हाताळले पाहिजे होते त्या प्रमाणात हाताळले गेले नाही.साहेबजी हे प्रकरण आपल्या कडे दोन महिने आधी आपल्या चेंबर मध्ये येऊन आपल्या सोबत चर्चा केली.मग आपण आठ दिवसांत कळवतो म्हणून सांगीतले?पण आपण लाभार्थ्याने प्रश्नाव्दारे कळवले त्या मुद्यांशी लाभार्थीचा संबंध नाही.आपण माननीय मुख्यकार्यपालन अधिकारी मॅडम ह्या आढावा मिटीग घेतात तिथे आपण व आधीच्या बि.डी.ओ साहेब ने हा मुद्दा उपस्थित केला का तिथे असे विषय मांडला जात नाही असा काही शासन निर्णय आहे का साहेबजी लिहण्यासाठी खुप विषय नियम बाह्य नाही शासन जे काम आपण करता त्याचा पगार दिला जातो त्या विषयी आहे पगार दिला जातो म्हणजे फुकटचा नाही घर घेत परंतु नव्वद टक्के लोक जेवढं तास काम करणं गरजेचं आहे तेवढं केल्या जात नाहीत हा मुद्दा चर्चेत घेणं मला शोभत नाही.
परंतु आपल्या कार्यालयाने गरीब घरकुल लाभार्थी याला चुकीचे पत्र दीले व जबाबदारी झटकत आहे.त्या मुळे हे लिहावं लागतं आहे तसेच या बाबतीत आपण लक्ष केंद्रित केले आहे.आपल्या प्रयत्नांना यश येवो ही च ईश्वर चरणी प्रार्थना करतो?
साहेबजी परंतु यश दहा एप्रिल पर्यंत नाही आल्यास आपल्या कार्यालयात घरकुल लाभार्थी राहुटी ने घरकुल मंजूर होईपर्यंत कायम मुक्कामाने राहिलं या बाबतीत आपणांस नोटीस दहा एप्रिल नंतर दिल्या जाईल याची आपण नोंद घ्यावी ही आपल्या चरणी प्रार्थना करतो साहेबजी.
आपला नम्र
श्री.सुनील प्रतापसिंह शिसोदे
रा नायगाव ता धामणगाव रेल्वे जि अमरावती














