तालुका प्रतिनिधी सचिन ठाकूर
धामणगाव रेल्वे :– धामणगाव रेल्वे तालुक्यात शिक्षणासाठी अग्रेसर व प्रसिद्ध असणाऱ्या धामणगाव रेल्वे एज्युकेशन सोसायटी दारासंचालित श्री धापूदेवी भट्टळ इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कूल येथे K.J १ च्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट ऑफिस उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद देत या कार्यक्रमाचा उद्देश च्या सोशल मीडिया तसेच डिजिटल युगातही कपाल वाहक म्हणजेच पोस्टमन याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आले होते तसेच शिक्षकांनी मुलांना सांगितले की आपल्या घरी पत्रे पार्सल तसेच महत्त्वाची कागदपत्रे पोहोचवतात ते लोकांना एकमेकांशी जोडण्याचे महत्त्वाचे कार्य करत असतात तसेच एका शब्दांना दुसऱ्या जवळ पोहोचवण्याचा दुवा म्हणून मन हा काम आणि आनंदाचे संदेश घराघरात पोहोचवण्याची काम पोस्टमन हा करत असतो या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मदतीने साडीवर आपले विचार लिहिलेले होते त्यानंतर मुलांनी शाळेत ठेवलेल्या विशेष पोस्ट बॉक्स मध्ये स्वताची पोस्ट टाक बनवून टाकलेली होती या कृतीमुळे मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळाले असून त्यांचा संवाद कौशल्याचा विकास सुद्धा झालेला होता.

या कार्यक्रमाला विशेष स्थान देण्यासाठी पोस्टमास्टर आशिष चौधरी यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लागली होती तसेच या कार्यक्रमाला यशस्वीरीचा पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापकाचे विशेष सहकार्य लाभलेले होते तसेच शाळा व्यवस्थापकाने शिक्षक आणि पालकाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत हा उपक्रम यशस्वी व स्मरणीय ठरल्याचे सांगितले..














