धामणगाव : Paravolleyball Federation of India यांच्या वतीने दिनांक २५ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान Meerut (उत्तर प्रदेश) येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पॅरा सिटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी धामणगाव येथील खेळाडू प्रशांत झाडे यांची निवड झाली आहे.
देशभरातील विविध राज्यांमधून उत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून, प्रशांत झाडे यांची निवड ही त्यांच्या सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर झाली आहे. त्यांनी जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
प्रशांत यांच्या निवडीमुळे धामणगाव शहराच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक क्रीडाप्रेमी, मित्रपरिवार तसेच नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील यशासाठी सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात असून, राष्ट्रीय स्तरावरही ते उत्तम कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

















