सन्माननीय महोदय/महोदया,
यानिमित्त गुरूवार, दि. 19 फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी 8 वाजता चांदूर रेल्वे शहरातून भव्य मोटर सायकल रॅली होणार असून या मोटर सायकल रॅली करिता आपण सर्वांनी नगर परिषद समोरील पक्ष कार्यालय ठिकाणी एकत्रित व्हायचे आहे.* याकरिता अवश्य यायचे आहे.
तसेच दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हा परिषद शाळेचे प्रांगण, चांदूर रेल्वे येथे शिवारंभ आख्यान भक्ती आणि कलेचा अनोखा संगम (लोककला महाराष्ट्राची) हा संगीतमय कार्यक्रम व प्रसिद्ध शिवव्याख्याते मा. प्रा . प्रवीणजी देशमुख यांचे जाहीर शिव व्याख्यान कार्यक्रम होणार आहे.
महाराज आपले बहुजनांचे आराध्य दैवत या कार्यक्रमास बहुसंख्येने अवश्य उपस्थित राहून शिवजयंती निमित्त महाराजांना मानाचा मुजरा करुया. आपली सर्वांची उपस्थिती अवश्य प्रार्थनीय आहे.
विनीत
शिव, शाहू, फुले, आंबेडकर जयंती उत्सव समिती चांदुर रेल्वे











