श्रीमती हरिबाई भागचंद प्राथमिक विद्यालय येथे सुसंस्कार वारी

0
37
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

सुसंस्कार येणाऱ्या काळाची गरज आहे…माऊली दास धामणगाव रेल्वे……. सुसंस्कारा विना मानव अपूर्ण आहे .जर त्याला सु संस्काराची जोड मिळाली तर तो आदर्श मानव होतो. मनुष्य पशु योनीतून आला l नराचा नारायण होणे त्याला यासाठी संस्कार देऊनी सावरीला क्रमाक्रमाने असे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात .आज कुसंस्कार शिकायला वेळ लागत नाही ते लवकर कशीहि आणि कुठेही मिळतात परंतु सुसंस्कार मात्र कुठेही मिळत नाही. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आदर्श घ्यावा लागतो .संत ग्रंथाचे सानिध्य घ्यावे लागते. तेव्हाच सुसंस्कार पूर्ण विद्यार्थी तयार होतो. आज श्रीमती हरिबाई भागचंद जी प्राथमिक विद्यालय धामणगाव रेल्वे येथे श्री ग्रामगीता प्रबोधन वारी विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना सुसंस्काराचे धडे ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी दिले. आजची तरुणाई आजचा समाज हा मोबाईल, टीव्ही व अन्य कारणाने विस्कळीत झालेला आहे. स्वतःचा भावासोबतच भांडणे आहे त्याचप्रमाणे आज स्त्रिया सुरक्षित नाही .

मुली सुरक्षित नाही करिता आज सुसंस्कार आवश्यक आहे संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत गजानन महाराज, संत चोखामेळा ,त्यासोबतच समाजसुधारकांमध्ये महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,सावित्रीबाई फुले, बाबा आमटे ,संत गाडगे महाराज ,संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,विनोबा भावे या महापुरुषांनी समाजाला आदर्श करण्यासाठी वेळोवेळी समाज प्रबोधन केले नवे नवे क्रांती करून नवीन समाज बदल घडून आणला परंतु आज आपण पाहतो आहे वाचन कमी झाले. आहे चांगल्या गोष्टीकडे लोकांचा कल कमी आहे.व्यसने वाढत आहे. त्यामुळे ते विचार समाजामध्ये आज दुरावत आहे. सुरुवातीला या कार्यक्रमामधून काहीतरी लोक शिकायचे परंतु अलीकडे एक विरंगुळा व माहोल याच उद्देशाने त्याकडे पाहिले जाते पर्यायाने त्यातून काहीही शिक्षण मिळत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनी लहानपणापासूनच शिवबांना बाळकडू सुसंस्काराचे दिले तेव्हा या महाराष्ट्रावर भगवा फडकविला म्हणून आज स्वामी विवेकानंद सारखे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे मानव तयार होणे काळाची गरज आहे. कारण आज आपण घराघरात बघतो आहे कलहाचे वातावरण आहे .आई-वडील वृद्धाश्रमात पाठवल्या जातात मात्र आई-वडिलांची हाल समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते .रस्त्यावरून जाताना मुली सुरक्षित नाही अशा अनेक कारणे आपल्याला सांगता येतील कोणतेही वर्तमानपत्र उघडले की त्यामध्ये आपल्याला खून, बलात्कार यासारख्या बातम्या अधिक प्रमाणात पाहायला मिळतात याचे कारण नीतिमत्ता मानव विसरत चाललेला आहे .म्हणूनच आज सुसंस्काराची आवश्यकता आहे. याच उद्देशाने ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी ग्रामगीता प्रबोधन वारी विद्यार्थ्यांच्यादारी या उपक्रमा अंतर्गत श्रीमती हरिभाई भागचंदजी प्राथमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रबोधन केले सोबतच बौद्धिक खेळ घेऊन विद्यार्थ्यांची मानसिकता तपासण्यात आली विविध खेळाच्या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते माऊली दास ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका बेबी शेंदरे उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना व शिक्षकांनाही प्रश्न विचारून बरोबर उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य भेट देण्यात आले. या कार्यक्रमाला विशेष सहकार्य मयूर धुर्वे ,सविता वाणी, सोनाली देशमुख ,सुषमा उगले, प्रणिता सोळंके ,सुषमा खोंडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्र वंदना घेऊन करण्यात आला.

veer nayak

Google Ad