गीत राठी ठरला ‘श्लोकाचार्य’…  देवयाणी संस्कृत श्लोक..

0
59

धामणगाव रेल्वे,

ऑलिंपियाडच्या माध्यमातून विश्वस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन मुंबई येथील कालबादेवी येथे पार पडले. या स्पर्धेत देशभरातून सर्व स्तरावरील विद्यार्थी सहभागी होतात राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या असलेल्या या स्पर्धेत धामणगाव रेल्वे येथील गीत प्रेरणा राठी हा चिमुकला “श्लोकाचार्य” ठरलेला आहे गीत ला प्रशिक्षण म्हणून येथील संस्कृत अध्यापिका सौ.अर्चना तापडिया यांचे मार्गदर्शन लाभले हे येथे उल्लेखनीय

या स्पर्धेमध्ये देशभरातून विविध वयोगटातील स्पर्धक यावेळी उपस्थित होते. यात गौरवशाली पुरस्कार प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील गीत राठी ला “श्लोकाचार्य” पुरस्काराने गौरविण्यात आले.

आपल्या संस्कृति संवर्धना बरोबरच भारतीय प्राचीन सनातन धर्माची जोपासना, आदि महाकाव्य, रामायण, महाभारत, वेद, उपनिषद, गीते वर आधारित श्लोकांचे मुखोद्गत पठण आणि भावार्थ सुद्धा चिमुकल्यांनी म्हणून दाखवले त्यात गीत राठी ला भारतीय संस्कृती आणि अध्यात्मामध्ये विशेष स्थान “श्लोकाचार्य” म्हणून प्राप्त झाले गीत आणि त्याच्या मार्गदर्शिका सौ.अर्चना तापडिया यांचे धामणगावच्या विद्यानगरीत सर्वत्र कौतुक केल्या जात आहे

संस्कृत श्लोक ऑलिंपियाडचे मुख्याधिकारी हरिश नागपाल व नीलम मॅडम यांच्या “देववाणी” मार्गदर्शनात ही स्पर्धा घेण्यात आली. संस्कृतमधील विविध विषयाच्या अध्ययनासाठी श्लोक महत्त्वाचे मानले जातात.

veer nayak

Google Ad