चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे शहरापासून सात किमी अंतरावर असलेले बागापुर येथे श्री संत खप्ती महाराज संस्थान तीर्थक्षेत्र शांतीकुंज आश्रम मध्ये शताब्दी वर्ष महोत्सव साजरा करण्यात येत आहे तेथे विविध कार्यक्रमाचे आयोजन संस्थान तर्फे करण्यात येते.
दिनांक 9.2.2026 ते 16.2. 2026 पर्यंत श्रीमद् भागवत सप्ताह ह भ प ओंकारनाथ महाराज झोड यांच्या शब्दसुमनाने होणार आहे.

प्रांता कालीन कळस पूजन स्थापन व अखंड विनावादक प्रारंभ नरेंद्र मोरे अशोक जी जयपुरिया यांच्या हस्ते श्रीची अभिषेक आरती प्रार्थना हत्ती चालीसा भजन श्रीमद् भागवत कथा पूजन होणार आहे दुपारी एक वाजता पशु रोग लसीकरण व रोग निदान शिबिर यांचे आयोजन करण्यात आले आहे. सभा मंडपात भक्ती संगीतांचे आयोजन करण्यात आले आहे.
15 फेब्रुवारी 2026 वार रविवारला नेत्र तपासणी शिबिरा होणार आहे. शांतीकुंज आश्रम व बागापुर ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन आहे. व तसेच रांगोळी सजावट करून गावातून श्री संत खप्ती महाराज यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
श्रीमत भागवत कथा समाप्ती वामन महाराज ह भ प महल्ले गुरुजी यांच्या उपस्थितीत होणार आहे तसेच दिनांक 16. 2. 2026 ला गोपाल काल्याचे किर्तन ह भ प लक्ष्मण काळे महाराज सादर करतील दहीहंडी श्री संत भिकाजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे यावेळी श्री संत मंगेश महाराज पांडे गुरुजी गणेश महाराज बग्गी मोहन गिरी प्रकाश वाघ बाबाराव पाटील पद्मश्री जनार्दन पंत बोते लक्ष्मण गमे गोपाल कडू उपस्थित राहणार आहे.
तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रताप अडसड आमदार रवी राणा आमदार किशोर जागेवर आमदार संजय गायकवाड माजी खासदार नवनीत राणा शेखर मुंदडा सुनील सूर्यवंशी नगराध्यक्ष अर्चना रोटे पूजा गायकवाड यांची उपस्थिती राहणार आहे तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भक्तगणाचा जनसागर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
















