चांदूर रेल्वे:- नगर परिषद निवडणुकीत आपल चांदूर पॅनल ज्या महत्वाच्या पक्षांची युती होती त्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचीही साथ होती प्रियंका निलेश विश्वकर्मा नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर जेव्हा अजित पवार हे अमरावती आले तेव्हा पहिल्यांदाच त्यांचा भेटण्याचा योग आला होता त्यावेळी त्यांचा आमदार खोडके यांनी परिचय करून दिला त्यावेळी त्यांनी माझे अभिनंदन केले आणि सुशिक्षित युवा पिढी राजकारणात येत असल्याचे पाहून कौतुक केले होते सोबतच शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले होते.
अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष प्रियंका विश्वकर्मा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या,अजित पवार हे नाव ऐकलं होत दादा म्हणून त्यांचा दरारा होताच, आपल चांदूर पॅनल मधे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा समावेश असल्याने त्यांचा फोटो सतत बॅनर वर राहत होता, त्यांच्या अश्या अकाली मृत्यूची बातमी ऐकली आणि काही काळ विश्वासच बसत नव्हता, योगायोगाणे त्यांची भेट झाल्याचे समाधान आहे, युवा व सुशिक्षित पिढीने राजकारणात यावे अशी त्यांची इच्छा असायची त्याच अनुषंगाने त्यांनी माझे कौतुक केले होते असे मत नगरध्यक्ष प्रियांका विश्वकर्मा यांनी व्यक्त करीत त्यांच्या प्रति संवेदना व्यक्त केल्या.
अजितदादा एक सुसंस्कृत नेता आपल्यामधून हरविला आहे. वेळेची काटेकोरपणे अंमलबजावणी करणारा,सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले,जे काही असतील त्याची निर्भीडपणे मांडणी करणारा आणि आपला सर्वांना आवडता नेता.मी कबड्डीचा खेळाडू असल्याने व अजितदादा कबड्डी संघाचे अध्यक्ष राहिल्याने त्यांच्याशी सातत्याने संबंध आला होता.त्यांचे अपघाती जाण्यामुळे क्रीडा क्षेत्राचे आणि महाराष्ट्र राज्याचे मोठे नुकसान झाले आहे.चांदूर नगरपालिका माझ्या व समस्त क्रीडा मंडळातर्फे त्यांना श्रद्धांजली.
निलेश विश्वकर्मा
प्रेरक अध्यक्ष, सेंट्रल कबड्डी युवा आघाडी














