धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी :
संतमणी सदगुरु परिवार, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने भक्तिभावाने संगीतमय सुन्दरकाण्ड पाठ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगलवार, दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या संगीतमय सुन्दरकाण्ड पाठ चे वाचन व विवेचन परम पूज्य संत सु. श्री. अलका श्री जी यांच्या सुमधुर व भक्तिरसपूर्ण वाणीतून होणार असून, या कार्यक्रमामुळे उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधान व भक्तीभावाचा अनुभव मिळणार आहे.
सदर कार्यक्रम आरोही रिसॉर्ट, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, धामणगाव रेल्वे येथे होणार असून, परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संतमणी सदगुरु परिवार, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने करण्यात आले आहे.













