चांदुर रेल्वे नगरपरिषद सभापतीची निवडणूक बिनविरोध , पाचही समितीवर भाजपाचे वर्चस्व

0
3

चांदुर रेल्वे /शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या पाच विषय समिती च्या सभापती पदाची निवडणूक नगरपरिषद कार्यालयाच्या सभागृहात ता 20 मंगळवार रोजी पार पडली यावेळी भाजपाने सर्व समित्यावर आपले वर्चस्व कायम ठेवत सर्व सभापती बिनविरोध निवडून आले

 

यावेळी चांदुर रेल्वे च्या नियोजन व विकास समितीचे पदसिद्ध सभापती न प उपाध्यक्ष असल्यामुळे उपाध्यक्ष प्रमोद हरगोविंद वांनरे यांची सभापती पदी पुन्हा निवड करण्यात आली,बांधकाम समिती सभापती पदी गजानन उत्तमराव ठाकरे यांची अविरोध निवड करण्यात आली तर स्वच्छता आरोग्य व शिक्षण समिती सभापतीपदी अनिल प्रताप मोटवानी, पाणीपुरवठा समिती सभापती प्राविण्य प्रमोदराव देशमुख, महिला व बालकल्याण समिती सभापती पदी दुर्गा रतनलाल भूत या पाचही सभापतीची निवडणूक बिनविरोध झाली,स्थायी समिती नामनिर्देशित सदस्य म्हणून भाजपाचे गटनेता निलेश भालेराव यांची वर्णी लागली, यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून धीरज कुमार गोहाड (मुख्याधिकारी) यांनी काम पाहिले तर नगराध्यक्षिका प्रियंका विश्वकर्मा मुख्याधिकारी चांदुर रेल्वे सुप्रिया टवलारे यांची उपस्थिती होती,

veer nayak

Google Ad