छोरिया नगरला नगरसेवक अविनाश ब्राम्हणवाडे यांची भेट; सौर पथदिवे चोरीप्रकरणी प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी

0
0

नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत हद्दीतील छोरिया नगर 2 व छोरिया लेआऊट परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक श्री. अविनाश ब्राम्हणवाडे व विरोधी गट नेते भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक संजय जी पोफळे राष्ट्रवादी नेते राहुल गेडाम यांनी नुकतीच भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परिसरातील प्रलंबित समस्या जाणून घेतल्या. यामध्ये सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पथदिव्यांच्या चोरीचा गंभीर मुद्दा नागरिकांनी त्यांच्यासमोर मांडला.

छोरिया नगर 2 मध्ये राहणारे श्री. राजू ढोके व दाणी बापू यांच्या घरासमोर बसविण्यात आलेले तीन सौर पथदिवे दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. या चोरीत सोलर पॅनल, लिथियम बॅटरी व लाईटचा समावेश आहे. हे पथदिवे नगर पंचायतमार्फत सार्वजनिक प्रकाशव्यवस्थेसाठी बसविण्यात आले होते.

या घटनेबाबत परिसरातील नागरिकांनी तात्काळ नगर पंचायत प्रशासन व पोलिसांना माहिती दिली होती. मात्र इतका मोठा कालावधी लोटूनही अद्याप पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नगरसेवक अविनाश ब्राम्हणवाडे व संजय पोपळे राष्ट्रवादी नेते राहुल भाऊ गेडाम यांनी घटनास्थळी पाहणी करत प्रशासनाच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली. “सार्वजनिक मालमत्तेची चोरी होऊनही जर तक्रार दाखल होत नसेल, तर ही गंभीर बाब आहे. याचा अर्थ गावातील सार्वजनिक मालमत्ता व नागरिकांच्या सुरक्षेबाबत संबंधित मुख्याधिकाऱ्यांना काही देणेघेणे नाही, अशी भावना निर्माण होत आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

या प्रकरणी तात्काळ पोलीस तक्रार दाखल करून दोषींवर कारवाई करावी, तसेच भविष्यात सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिक व स्थानिक प्रतिनिधींनी केली आहे.

उपस्थित – विजय सोनोने शुभम ब्राम्हणवाडे, विक्की भगत, अभिषेक पवार

veer nayak

Google Ad