तळेगाव दशासर : कृषक सुधार मंडळाच्या वतीने आयोजित पारंपरिक शंकर पट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. या सोहळ्याला परिसरातील नागरिकांसह मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.


यावेळी प्रमुख उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव धनजोडे, तळेगाव दशासर येथील कर्तव्यनिष्ठ ठाणेदार श्री. किरणजी आवटे साहेब, भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष संजय सारवे, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका सचिव आतिश बनारसे, तसेच रविभाऊ चुटे, पंकजभाऊ चुटे, विकास नवरंगे, विनोद घुले, माणिकभाऊ बगाडे, संजयजी हागे, अशोकराव गायकवाड, डॉ. विनोदजी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
कृषक सुधार मंडळाचे सचिव आनंद देशमुख यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य व स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. शंकर पट स्पर्धेमुळे ग्रामीण संस्कृतीचे जतन होत असून युवकांना परंपरेची ओळख करून देण्याचे कार्य या माध्यमातून होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
बक्षीस वितरण सोहळ्याच्या माध्यमातून विजेत्या बैलजोडींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला















