धामणगाव रेल्वे,
तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲड.आशिष राठी प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती डॉ. सौ.अर्चना अडसड रोठे “आक्का”, दर्पण पुरस्कार मानकरी कमल छांगाणी, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पवन शर्मा, ज्येष्ठ पत्रकार अशोक मुंदडा मंचावर उपस्थित होते. मराठी पत्रकारितेचे जनक व आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवसानिमित्त स्थानिक परिवार रेस्टॉरंट येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
………………………
दर्पण पुरस्कार कमल छांगाणी यांना प्रदान…..
या वर्षीचा दर्पण पुरस्कार कमल छांगाणी यांना प्रदान करण्यात आले ॲड.आशिष राठी व नगराध्यक्ष अर्चनाताई रोठे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त करतांना छांगाणी म्हणाले की, आपल्या पत्रकारितेमधून सदैव समाजात सत्कार, संस्कृति,ज्ञान, चारित्र, एकता, राष्ट्रीयता निर्माण व्हावी असा संकल्प असावाच आपल्या लेखणीमधून समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता नेहमी पत्रकारांनी बातमी लिहिताना लक्षात ठेवणे गरजेचे आहेच
……………………..
मी आज जे काही दिसते आहे त्यात धामणगावच्या पत्रकारांचा सहकार्याबाबत सिंहाचा वाटा आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची चिकित्सक वृत्ती व लिखाण समाजाला दशा व दिशा देण्याचे कार्य करते पत्रकारांचं समाजातील हे कार्य उल्लेखनीय असे आहे धामणगाव च्या पत्रकारांनी तर मला बहुमूल्य असे सहकार्य केलेले आहे नगराध्यक्ष म्हणून पत्रकारांकरीता सामूहिक रित्या जे काही करता येईल मी नक्कीच करेल असे प्रतिपादन उपरोक्त प्रसंगी नगराध्यक्ष अर्चनाताई अडसड रोठे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.आशिष राठी म्हणाले की, पत्रकारांनी सत्यता जाणूनच त्याबाबतचे लिखाण केल्यास समाजाला या गोष्टीचा नक्कीच लाभ मिळतो आणि पत्रकारांची विश्वसनीयता अधिक वाढते धामणगावच्या सर्वच पत्रकारांचे सामाजिक कार्य सुद्धा उल्लेखनीय आहे समाजातील प्रत्येक चांगल्या कामात पत्रकारांचा सहभाग असतोच असेही ते म्हणाले
—————————————-
याप्रसंगी धामणगाव तालुक्यातील पत्रकार बोधीसत्व काळे,मिलिंद पहाडे,हाफीज खान ,राजकुमार पसारी,अनुप पुरोहित,राहुल गौतम,खालीदभाई ,,सलील काळे,राजु गायकवाड, संजय सायरे,पवन बहल ,सचिन ठाकूर, सतीश मुंदडा, अनिल शर्मा, प्रशांत मुन , नितीन टाले, अरुण डोंगरदिवे, सह वृत्तपत्र विक्रेता नंदकुमार पहाडे अक्षय सिंग ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार मंगेश भुजबळ संचालन संपादक संजय पांडे आभार पत्रकार मनीष मुंदडा यांनी मानलेत











