आंतरराष्ट्रीय मानव अधिकार असोसिएशनचे महत्त्व काय दिली माहिती ; विलास कांबळे

0
38

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : शासकीय विश्रामगृह मध्ये आंतरराष्ट्रीय मानव अधिकार असोसिएशन नवी दिल्ली च्या वतीने कार्ड वितरण सोहळा चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष श्री विलास कांबळे तसेच प्रमुख अतिथी मा. चंद्रशेखर ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमा मध्ये श्री सुधीर रामटेके राष्ट्रीय सहसचिव, सुजाताताई शेंडे महिला प्रभारी, नीलिमा जांभुळकर विदर्भ उपाध्यक्ष ,लक्ष्मीदेवी विश्वकर्मा राष्ट्रीय सदस्य, इंदिरासिंग राणा नायादाबेगम शेख, प्रमिला नाईक वर्धा महिला जिल्हाध्यक्ष ,सुनील कुरर्हेवार जेष्ठ सदस्य, डॉ. विनय कांबळे राष्ट्रीय प्रवक्ता, मारोती बडगेवार राष्ट्रीय कोषाध्यक्ष ,अंकुश वाळके वर्धा जिल्हा महासचिव मंचकावर उपस्थित होते. अनुप कुमार भार्गव प्रदेश उपाध्यक्ष यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. राष्ट्रीय अध्यक्ष श्री विलास कांबळे अध्यक्ष स्थानी मार्गदर्शन करताना सांगितले की आंतरराष्ट्रीय मानव अधिकार असोसिएशन ही पार दर्शक मध्ये काम करते.

संघटनेला नीती आयोग, स्वतःचा ट्रेडमार्क ,आय .एस.ओ .सर्टिफिकेट आहे. सि. एस .आय . सर्टिफिकेट असून कायद्याच्या चौकटीत राहून काम करायचे आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मानव आयोगा सोबत मिळून संपूर्ण देशात काम करणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोग कोर्ट सुद्धा दिल्ली, मुंबई ला वेगळा आहे. असे महत्त्व सांगत आपले मत प्रगट केले. प्रमुख अतिथी मा. चंद्रशेखर ढोले साहेब मार्गदर्शन करताना म्हणाले की मानवाधिकार खूप मोठा प्रस्थ आहे. भारत हा लोकशाही देश आहे आणि जे घटनेने अधिकार दिले आहे त्याचे हन्न होऊ नये. म्हणून संघटनेची निर्मिती झाली आहे. तसेच इतर पाहुण्यांनी आपले मत प्रगट करून मार्गदर्शन केले यावेळेस नितीन आष्टीकर तालुका अध्यक्ष ,तसेच सुशील कट्टा व सुनील जोशी यांना कार्ड वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन नितीन आष्टीकर व आभार प्रदर्शन प्रा. दारुंडे सर यांनी मानले या कार्यक्रमाला पत्रकार मंडळी तसेच कार्यकर्ते व नागरिकांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाला यशस्वी केले

veer nayak

Google Ad