वाढोणा येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव थाटात साजरा

0
8

धामणगाव रेल्वे/

दरवर्षीप्रमाणे वाढोणा येथे वर्ष 45 वे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव वाढोणा गा.

 गावांमध्ये साजरा करण्यात आला हा कार्यक्रम पाच दिवसीय असुन घटस्थापना तळेगाव दशासर येथील ठाणेदार किरण औटे यांच्या हस्ते झाली व त्यांनी या वेळेस सर्वांना मार्गदर्शन केले त्यानंतर सर्वधर्म सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावर गुरुदेव प्रचारक विशाल ठाकरे यांनी मार्गदर्शन केले दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता सामूहिक ध्यान व ध्यानाच्या महत्त्वावर रूपरावजी बुटके यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर रांगोळी स्पर्धा भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. सकाळी सात वाजता सर्वधर्म सामूहिक ध्यानाच्या महत्त्वावर ग्रामगीता प्रचारक रवी दादा चौधरी यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता सामुदायिक ध्यानाच्या महत्त्वावर डॉक्टर प्रशांत इंगोले यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर सकाळी आठ वाजता वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांची रामधून फेरी गावांमधून काढण्यात आली. दुपारला महिला हळदि कुंकवाचा कार्यक्रम आटोपला सायंकाळी सात वाजता सर्व धर्म सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावर अनिल जी बगाडे यांनी मार्गदर्शन केले. चौथ्या दिवशी सकाळी पाच वाजता सामुदायिक ध्यान व ध्यानाच्या महत्त्वावर विक्रमजी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी सात वाजता सर्व धर्म सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर प्रमोदजी हातेकर व विलासजी पाटील यांनी मार्गदर्शन केले.पाचव्या दिवशी सकाळी पाचला सामुदायिक ध्यान व ध्यानाच्या महत्त्वावर पोलीस पाटील रूपेश तितरे यांनी मार्गदर्शन केले. नंतर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पालखीची भव्य शोभायात्रा गावांमधून निघाली नंतर काल्याचे किर्तन ह.भ.प. श्री. निलेश महाराज मोहोकार यांनी केले व त्यानंतर समाजकार्यात व गावातील प्रगतशील शेतकरी गुणवंत विद्यार्थिनी यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये सत्कारमूर्ती ग्राम स्वच्छता दूत त्र्यंबकराव गुलाबराव गायकवाड, पत्रकार गजानन फिरके प्रशांत नारे, अतुल तितरे, राजेंद्र राऊत, कर्मयोगी फाउंडेशन, आम्ही बालाजी फाउंडेशन, अंकुश गाते, अशोक निखाडे, संदीप राऊत, संजय काळे, रोशन तितरे, गजानन पुनवटकर, विद्यार्थिनी राधिका जुनघरे, धनश्री माळोदे, श्रुती वाळके, श्रावणी गायकवाड, गुंजन चहांदे, यांचा यावेळी शाल व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला. व नंतर व लगेच भव्य असे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती भाऊरावजी बगाडे, रवी भाऊ चौधरी, गिरीश भाऊ भुतडा,मारोतराव सातपुते, ठाणेदार किरणजी औटे, अनिलजी बगाडे, स्वातीताई शैलेंद्रजी मेटे, विशाल भाऊ ठाकरे, पत्रकार गजानन फिरके, त्र्यंबकराव गायकवाड, राजीव भाऊ भेंडे, गोपाल भाऊ भापकर, यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती, नंतर जवाहर सुतगिरणीचे संचालक पंकज भाऊ गायकवाड गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष राजुभाऊ ठोंबरे, राजूभाऊ तितरे, विजय पाटील, सुरज तितरे ,पवन राठी, विवेक गुडधे,किरण गुडधे ,विलास हरणे, सुनील नेरकर, अतुल तितरे ,सचिन भोयर,या सर्व गुरुदेव भक्तांनी कार्यक्रम यशस्वी केला नंतर राष्ट्रवादींना घेऊन गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष राजीव ठोंबरे यांच्या वतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यामध्ये गावातील नागरिक व तरुण- तरुणींनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला होता.

veer nayak

Google Ad