गुटखा माफियांवर सरकारची मोठी कारवाई; मुख्यमंत्री फडणवीसांची मकोका लागू करण्याची घोषणा

0
4

महाराष्ट्रातील वाढत्या गुटखा उत्पादन व अवैध विक्रीच्या गुन्हेगारी साखळीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुटखा उत्पादन, साठेबाजी आणि विक्रेत्यांवर थेट मकोका (MCOCA) लागू करण्याची घोषणा केली.

या निर्णयामुळे अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या कारवाईला मोठी ताकद मिळणार असून, परराज्यातून अवैध मार्गाने येणाऱ्या गुटखा आणि सुगंधी तंबाखूच्या पुरवठ्यावर मोठा अंकुश बसणार आहे. राज्यभरात गुटखा माफियांची मजबूत साखळी कार्यरत असल्याचे अनेक वेळा समोर आले होते. कठोर कायद्याच्या अभावामुळे आरोपी सुटत असल्याच्या तक्रारीही नोंदवल्या जात होत्या.

सरकारच्या या निर्णयामुळे तंबाखू माफियांच्या हालचालींवर थेट मर्यादा येतील, तसेच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, असे तज्ञांचे मत आहे.

veer nayak

Google Ad