रवी भुतडा यांच्या अथक प्रयत्नांना यश. मंगरूळ दस्तगीर येथे नाफेड शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी.

0
41
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

मंगरूळ दस्तगीर – सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष रवी भुतडा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून मंगरूळ दस्तगीर व सरकल परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले नाफेडचे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यास शासनाची परवानगी मिळाली आहे.

या निर्णयामुळे सर्कलमधील सर्व शेतकऱ्यांना आता आपला शेतीमाल थेट सेवा सहकारी सोसायटी, मंगरूळ दस्तगीर येथे हमीभावाने विक्रीची सुविधा उपलब्ध होणार आहे. खरेदी केंद्रासाठीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सोसायटीकडून देण्यात आली.

नाफेडचे खरेदी केंद्र सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या कृषी उत्पन्न विक्रीची अडचण मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे.

या उपक्रमासाठी पुढाकार घेतलेल्या मान्यवरांचे शेतकऱ्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले व अभिनंदन केले. विशेषतः—

श्री रतनलाल भुतडा, संचालक रतन जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरी

बांकाम सभापती, क.उ.बा.स. धामणगाव रेल्वे

अध्यक्ष – सेवा सहकारी सोसायटी, मंगरूळ दस्तगीर

मा. पंचायत समिती सदस्य

या सर्वांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांसाठी लाभदायी निर्णय प्रत्यक्षात उतरल्याचे शेतकरी बांधवांनी म्हटले आहे.

veer nayak

Google Ad