“माझी विजयश्री निश्चित, धामणगावात भाजपाच सत्तेत येणार” – डॉ. अर्चना अडसड (रोटे)

0
7

धामणगाव – प्रतिनिधी

धामणगाव नगरपरिषद निवडणुकीत माझा विजय निश्चित असून भाजपाच सत्ता स्थापेल, असा ठाम विश्वास भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. अर्चना अरुणभाऊ अडसड (रोटे) यांनी व्यक्त केला. त्यांनी वीर नायक चॅनेलला दिलेल्या विशेष मुलाखतीत नागरिकांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विकासाचा संकल्प याबाबत खुलून संवाद साधला.

कुटुंबातूनच राजकारणाची प्रेरणा – लहानपणापासून खेळातही प्राविण्य

डॉ. अर्चना म्हणाल्या, “राजकारण आणि समाजकार्याचे संस्कार मला घरातूनच मिळाले. लहानपणापासूनच खेळाची आवड असल्याने मी विद्यापीठ पातळीवर बास्केटबॉल खेळले. 12वी पासून ABVP च्या माध्यमातून समाजकार्यात उतरले. पुढे भाजपाने माझ्यावर विश्वास ठेवत मला जबाबदारी दिली.”

पाण्याचा प्रश्न संपुष्टात – 50 वर्षांची जलव्यवस्था सुनिश्चित

“जेव्हा माझे वडील अरुण अडसड नगराध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी धामणगावात मोठी जलपुरवठा योजना आणली. दत्तापुरमध्ये कमी दाबाने पाणी येत होते, ती समस्या आमदार प्रताप अडसड यांनी सोडवली. आजची जलव्यवस्था पुढील 50 वर्षांसाठी सक्षम आहे,” असे त्यांनी सांगितले.

महिलांसाठी घरबसल्या रोजगार – क्लस्टर योजना लागू

“शहरातील प्रत्येक मतदारांपर्यंत मी स्वतः पोहोचले असून महिलांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. धामणगावमध्ये महिला क्लस्टर योजना लागू करून त्यांना घरूनच रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. महिला सक्षम झाल्या की संपूर्ण समाज सक्षम होतो,” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

धामणगावमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग पूल

युवा आणि क्रीडा विकासाबाबत बोलताना त्यांनी सांगितले,

“धामणगावच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात संधी मिळावी म्हणून आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग पूल उभारण्याचा संकल्प केला आहे. तसेच तरुणांना रोजगारासाठी भटकावे लागू नये, यासाठी मोठा प्रकल्प आणण्याचेही आमचे प्रयत्न सुरु आहेत.”

veer nayak

Google Ad