पक्ष कोणता प्रचार कोणाचा पक्षाने भर भरून देऊन सुद्धा पक्षाच्या उमेदवारासोबतच दादांचा दुजाभाव

0
281
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

विधानसभेत अपप्रचाराचा फरक पडला नाही तर नगरपरिषद निवडणुकीमध्ये फरक पडणार का?.

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी प्रचाराला चांगलीच रंगत आलेली दिसत आहे.

मात्र पक्ष कोणता प्रचार कोणाचा हेच क्रूर कृत्य चित्र विधानसभेत सुद्धा पाहायला मिळाले होते. परंतु त्या अपप्रचाराने विधानसभेत कोणताही फरक पडलेला नाही. असे स्पष्ट दिसून आले. तसेच नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला २० तारखेपासून चांगलाच पेठ धरलेला आहे. काही सत्ताधारी पक्षाचे नेते प्रचार माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केलेला तोच अपप्रचार आजही करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. परंतु याचा परिणाम नगरपरिषदेच्या निवडणुकीवर किंवा सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारावर कितपत फरक पडणार हा देखील अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे. सुनेला पक्षाच तिकीट न दिल्यामुळे हे कटकारस्थान कृत्य करत तर नाही ना? पक्षाने भरभरून दिलेल्या सत्ताधारी पक्षाच्या दादांकडूनच पक्षाचा अपप्रचार करून हे आपण आपल्या प्रचारातून काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या व्यक्तीचा आपण प्रचार करत आहे त्याच व्यक्तीने आपल्याला गांधी चौकात सभा घेऊन अपमान जनक शब्दात बोलल्या गेले होते. तर खरंच आपण फक्त काही उमेदवार सोबत घेऊन आर्वीच्या विकासात्मक दृष्टिकोन ठेवून प्रचार करत आहे का? ज्या पक्षाने आपल्याला मोठं केलं आणि त्याच पक्षात दुजाभाव दाखवून असा अपप्रचार करत आहे खरंच आपण पक्षाला न्याय देऊ शकणार का? याची देखील आर्वी शहरात जोरदार चर्चा होत आहे.

veer nayak

Google Ad