अंजनवतीजवळ सोलर पॅनल वाहतूक करणारा ट्रक पलटी सोलर पॅनलचे मोठे नुकसान; चालक जखमी

0
7
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अंजनवती परिसरात सोलर पॅनल घेऊन जाणारा ट्रक अचानक तोल गेल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना आज दुपारी घडली. अपघातात ट्रकमधील सोलर पॅनेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करून अपघाताचे कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.

या भागात अनेकदा छोटे-मोठे अपघात घडत असल्याने हा रस्ता अपघातप्रवण झाला आहे. त्यामुळे अशा दुर्घटनांना आळा घालण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

veer nayak

Google Ad