राज्य सुजलाम सुफलाम व्हावे व या राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा या उदात्त हेतूने ज्या शेतकऱ्यांनी राज्यात हरीत क्रांतीचा उद्देश साध्य करण्यासाठी सरकारच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत. आपल्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेल्या अनमोल अशा जमिनी घरे अत्यंत कवडीमोल दराने धरणं उभी करण्यासाठी सरकारच्या स्वाधीन केल्यात आज तोच प्रकल्पग्रस्त शेतकरी, पूनर्वसीत नागरीक, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारक सुशिक्षित बेरोजगार व संपादित शेतीवरील कामं करणारा शेतकरी मजुर अत्यंत हलाखीचे जीवन जगत असुन मरण यातना सहन करत आहेत.

याला शासन व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्षांसह उदासीन धोरण जबाबदार असल्याचे मत बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज दादा चव्हाण यांनी व्यक्त केले.ते चंद्रभागा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या असदपूर/शहापूर येथील प्रकल्पग्रस्तांनी आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.दिनांक ७ नोव्हेंबर दोन हजार २५ रोजी येथील बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या नामफलकाचा अनावरण सोहळा नृसिंह विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता ते पुढे म्हणाले की.शासनाच्या धोरणा नुसार एक धरण एक न्याय हि संकल्पना शासनाचीच असताना सुद्धा एकाच प्रकल्पावर अनेक प्रकारच्या कायद्यांचा वापर करून अधिकाऱ्यांनी येथील शेतकऱ्यांची व सर्वसामान्य प्रकल्पबाधितांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली असल्याचा आरोप मनोजदादा चव्हाण यांनी केला.

चंद्रभागा लघु प्रकल्पात कायद्याचे उल्लंघन करुन येथील प्रकल्पग्रस्तांवय अन्याय केला जात आहे.व येथे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे येथील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या समस्या मांडतांना सांगितले.संपूर्ण महाराष्ट्रात बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना प्रकल्पग्रस्तांच्या न्याय व हक्कासाठी लढा देत असुन प्रकल्पग्रस्तांवरील अन्यायला वाचा फोडल्या शिवाय थांबणार नाही असे प्रखख मत संघटनेचे उपाध्यक्ष प्रा निलेश ठाकरे यांनी मांडले.यावेळी संघटनेचे मुख्य सचिव गौतम खंडारे प्रवक्ते श्रीकृष्ण बैलमारे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रशांत मुरादे, अकोला जिल्हाध्यक्ष नितिन मलमकार, वाशीम जिल्हाध्यक्ष मोहन गहूले, मनोज तंबाखे अभय जैन शरद खलोकार, राजु देठे यांनी प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच मोहन मुंदाणे यांनी भुषविले तर प्रमुख उपस्थिती शरद शर्मा यांची होती.प्रास्ताविक शेख नाशीर यांनी केले तर सुत्रसंचलन ग्रा. पं सदस्य अतुल गिरी यांनी केले आभार प्रदर्शन सचिन ढवळे यांनी मानले यावेळी संघटनेच्या शाखाध्यक्ष पदी हफीज शहा कुतुबशहा या़ंची निवड करण्यात आली. सचिव प्रशांत कपाटे उपाध्यक्ष शेखर ताथोड कोषाध्यक्ष मो. साजिद तर प्रकल्प प्रमुख म्हणून शेख नाशीर यांची नियुक्ती करण्यात आली. सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून सचिन ढवळे तर सदस्य पदी संतोष नितनवरे,शेख फारुख भाई, साहेबराव नितनवरे साहेबराव थोरात, शरद शर्मा, इत्यादींची निवड करण्यात आली आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.














