गुरुनानक जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : सिंधी संगत गुरुद्वारा साहिब आणि गुरुनानक जन्मोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुनानक जयंतीचा प्रकाशपर्व साजरा करण्यात आला. व मिरवणूक काढण्यात आली. ज्यामध्ये सिंधी समुदायांसह अनेक गुरु अनुयायांनी उत्साहाने भजन आणि कीर्तन करत गुरु नानकदेव यांचा जय जयकार केला शहरात जागोजागी या मिरवणुकीचे उत्स्फूर्त फुलांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले. व गुरुनानकदेव यांच्या जीवनावर आधारित बोर्ड लावण्यात आले, सिंधी कॅम्प, गुरुनानक धर्मशाला चौक इथे स्वागत द्वार व फलक लावून विविध राजकिय व सामाजिक संघटना कडून स्वागत करण्यात आले.
दुपारी स्टेट बँक कलोनी गुरुद्वारांमध्ये लंगर प्रसादाचे आयोजन करण्यात आले आणि सायंकाळी श्री गुरनानक सिंधी धर्मशाला येथे. याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. यासोबतच गेल्या चार दिवसा पासून सुरू असलेल्या प्रभातफेरीनी आर्वी शहराला भक्तिमय रूप प्राप्त झाले होते. अमृतवेला ट्रस्ट चे सदस्यांनी प्रभातफेरी आणि गरू ग्रंथ साहेबांची प्रार्थना करण्याची परंपरा उत्तमप्रकारे सुरु ठेवली. स्वच्छतेचा संदेश देत सिंधी समाजातील मुल व महिलांनी रस्ता झाडून स्वच्छ करायचे व रोडवर पाणी मारायचे नंतर सर्व भाविक त्या मार्गावर चालत होते.
सजविलेल्या रथावर गुरुग्रंथ साहेब विराजमान झाले होते. पंच प्यारे मिरवणुकीत विशेष वेशभूषा करून चालत होते दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा करण्यात आली.
या प्रभातफेरीमध्ये सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेतेमंडळी व व्यापारी बांधवांनी गुरुनानक देव यांच्या फोटोचे दर्शन घेत शोभायात्रेत सहभाग नोंदविला होता. तसेच गुरुनानक जयंती निमित्त शोभायात्रा काढण्याकरिता सर्व सिंधी समाज एक दिवस आपले प्रतिष्ठान बंद ठेवून या शोभायात्रेचा आनंद घेत असतो तसेच यावेळी सर्व सिंधी समाज बांधवांची मोठ्या संख्येत प्रामुख्याने उपस्थिती असते.













