मंत्रालय, मुंबई
राज्य सरकारने नुकसानग्रस्त 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपयांची मदत करण्याचे जीआर काढले असून यापैकी 1829 कोटी रुपये संबंधित जिल्ह्यांमध्ये पोहोचले आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांना येत्या 8-10 दिवसांमध्ये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. या दिलासादायक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन आमदार प्रतापदादा अडसड यांनी मानले आभार!
मुंबई मंत्रालय येथे कॅबिनेट बैठकी पूर्वी आमदार प्रतापदादा अडसड यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली यावेळी अतिवृष्टीमुळे सोयाबीन,कपाशी व फळबागांच्या पिकाच्या झालेल्या नुकसानीबाबत, विद्यार्थ्यांच्या सन 2023-24 व 2024-25 या शैक्षणिक वर्षातील आचार्य पदवी (पीएचडी) विद्यार्थी, विद्यार्थिनीच्या अधिछात्रवृत्तीबाबत बार्टी,सारथी,महाज्योती,अमृत व आर्टी संस्थामार्फत जाहिरात प्रक्रिया करून सर्व नोंदणीकृत संशोधकांना सरसकट लाभ देण्याबाबत, धामणगाव रेल्वे मतदार संघातील विविध अडचणी व विकास कामांच्या मागणी संदर्भात मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र दिले व राज्य सरकारने नुकसानग्रस्त 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपयांची मदत करण्याचे जीआर काढले असून यापैकी 1829 कोटी रु. संबंधित जिल्ह्यांमध्ये पोहोचले आहेत. तर उर्वरित शेतकऱ्यांना येत्या 8-10 दिवसांमध्ये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. या दिलासादायक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांचे आमदार प्रतापदादा अडसड यांनी यावेळी आभार मानले.












