आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : आज दिनांक 26 जून 2025 ला नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (गांधी विद्यालय) आर्वी, येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरी करण्यात आली.सोबतच 26 जून हा दिवस विद्युत सुरक्षा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत विद्युत सुरक्षा संबंधित विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये विद्युत सुरक्षा बाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य श्री. विश्वेश्वर पायले हे होते तसेच प्रमुख अतिथी माननीय श्री सुमित सुरेशचंद्र चांडक सहाय्यक अभियंता विद्युत निरीक्षक कार्यालय वर्धा, माननीय श्री अमित बबनराव गायकी उप-कार्यकारी अभियंता महावितरण आर्वी, माननीय श्री गणेश बर्वे सहाय्यक अभियंता आर्वी शहर ,माननीय श्री निखिल घायवट सहाय्यक अभियंता आर्वी ग्रामीण. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे जेष्ठ कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक श्री नितीन बोडखे सर यांनी केले. चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून प्रथम तीन विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले त्याचप्रमाणे सहभागी विद्यार्थ्यांना सुद्धा प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. विद्युत सुरक्षा बाबत माननीय चांडक सर व माननीय गायकी सर यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यालयातील श्री दत्तात्रय खंदारे सर यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आले प्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाच्या पर्यवेक्षक कुमारी ज्योती अजमिरे व विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री संजय किटे सर उपस्थित होते, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक कुमारी हर्षदा कडू यांनी केले त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक कुमारी शिवानी बोराडे यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विद्यालयाच्या पर्यवेक्षक अजमिरे मॅडम यांनी केलेले होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनापासून योगदान दिले.