मनामनात भगवत भक्तीची ज्योत. प्रज्ज्वलित होणे आवश्यक. ह.भ.प.वैष्णवीताई खडतकर (आळंदीकर) यांचे वरुड बगाजी येथे प्रतिपादन 

0
32
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे – आपला देश, धर्म, संस्कृती आणि परंपरा टिकून राहण्यासाठी मनामनात भगवत भक्तीची ज्योत प्रज्ज्वलित

 होणे आवश्यक आहे आणि हे कार्य श्रीमद् भगवतगीतेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे होऊ शकते . कारण आपल्या जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे भगवतगीतेत मिळतात असे प्रतिपादन ह.भ.प.वैष्णवीताई खडतकर (आळंदीकर) यांनी वरुड बगाजी येथे संगीतमय भागवत सप्ताहाच्या समारोपप्रसंगी केले . 

दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही वरुड बगाजी, ता. धामणगाव( रेल्वे ) येथे 30 एप्रिल ते ६ मे दरम्यान श्री संत बगाजी महाराज समाधी सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते .यात तीर्थ स्थापनेनंतर दररोज दुपारी संगीतमय भागवत कथा आणि रात्री विविध ठिकाणाहून आलेल्या संत मंडळींनी आपली कीर्तन सेवा दिली. “भागवत ” कार ह.भ.प.वैष्णवीताई खडतकर यांनी समाजात आज महिला आणि लहान लहान मुलींवर जे अत्याचार आणि अनाचार होताना दिसतात त्यामागे संस्कार नसलेल्या घटकांचा हात असतो . त्यामुळे प्रत्येक कुटुंबात मुलांवर लहानपणीच चांगले संस्कार होणे आवश्यक आहे .

कारण चांगली तरुण पिढी हीच देशाची ताकद असल्याचेही त्यांनी सांगितले. विषयांचे आकलन,अचूक संदर्भ आणि ओघवते निवेदन यामुळे ही भागवत कथा श्रोत्यांना उत्तरोत्तर अधिकाधिक आकर्षित करणारी ठरली. त्यांना ह. भ. प. समीर महाराज कुबडे (ऑर्गन व गायन),संकेत महाराज वाघमारे (तबला )आणि रोशन महाराज चांदुरकर (पॅड) यांनी अत्यंत सुरेल आणि सुरेख साथसंगत केली. या भागवत कथेवेळी कृष्णजन्म, कृष्ण विवाह, रासलीला , कृष्ण – सुदामा भेट आदीप्रसंगी अत्यंत आकर्षक झांकी सुद्धा काढण्यात आल्या. 

 ६ मे रोजी ह.भ.प.भास्कर महाराज पिंपळे (तात्या महाराज) कुऱ्हा यांच्या काल्याच्या कीर्तनाने या समाधी सोहळ्याची सांगता झाली. 

आराध्य महाराज कोरडे यांचे प्रबोधन

 श्री संत बगाजी महाराज समाधी सोहळ्याच्या समारोपाला खंजिरी वादक ह.भ.प. आराध्य महाराज कोरडे (यवतमाळ) यांनी विनोदाच्या माध्यमातून प्रबोधन केले .दारू आणि व्यसनमुक्ती यावरील त्यांचे सादरीकरण मनोरंजनासोबतच डोळे उघडणारेही ठरले .त्यांना मिलिंद गुरनुले आणि मंगेश आदे यांनी सहकार्य केले .

या संपूर्ण सोहळ्यासाठी राजू (राजेंद्र) दगडकर, विपिन दगडकर, विवेक दगडकर, ह.भ.प.धीरज महाराज तिजारे ,ह.भ.प.गणेश महाराज नघाट यांच्यासोबतच वरुड बगाजी येथील समस्त गावकरी मंडळी आणि विशेषतः स्वयंसेविकांनी अनमोल सहकार्य केले. 

….

veer nayak

Google Ad