धामणगाव रेल्वे,
श्रीराम जन्मोत्सव समिती द्वारा रविवारी शहरात भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले ‘जय श्री राम’ च्या गगन भेदी जयघोषानांनी शहर दुमदुमले.
दरवर्षी शहरात श्रीराम जन्मोत्सव समिती च्या वतीने भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असते. शोभायात्रेत ग्रामीण भागातून व शहरातून प्रचंड भाविकभक्तांची गर्दी होते. रविवारला श्रीरामनवमी जन्मोत्सव शहरातील विविध मंदिरांमध्ये साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे शोभायात्रेला स्थानिक जुना दत्तापूर येथील सुरुवात झाली. याप्रसंगी शोभायात्रेत असलेल्या श्रीराम मूर्तीचे पूजन आमदार प्रताप अडसड, डॉ. धर्मचंद गुप्ता,विलास बुटले, दुर्गाप्रसाद गौतम,लक्ष्मीनारायण जयस्वाल, किसन यादव, जितेंद्र चौधरी शोभायात्रा समितीचे विवेक गौतम सह इतर मान्यवर व आयोजन समितीच्या प्रमुखांनी केले. समितीने आमदार अडसड यांना श्रीरामाची मूर्ती याप्रसंगी भेट दिली
ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या भव्यदिव्य शोभायात्रेमध्ये डीजेच्या तालावर भाविकांनी ताल धरला होता. दरम्यान ‘जय जय राम,जय श्रीराम’ च्या घोषणांनी आसमंत दुमदुमले होते.बेंजोबँड,भजनी मंडळे, अश्व रथावर स्वार भगवान श्रीराम लक्ष्मण सीता व पवन पुत्र हनुमानाचा सजीव देखावा,भारत माता,गाय बचेगी,देश बचेगा त्याचप्रमाणे श्रीराम द्वारा जलाभिषेक व श्री राम देखाव्याचे भाविकांनी दर्शन घेतले.भजनी मंडळ , महाकाल पथकाने गर्दीचे लक्ष वेधले श्रीराम हनुमंताच्या वानर सेनेचे वेशभूषेतील सजीव देखाव्यात उपस्थित लहान बालके यावेळी श्रीराम जयघोषात सामील झाली होती या शोभायात्रेत भगवान श्रीरामाची व हनुमानाची सुंदर आणि देखणी भव्य मूर्ती भक्तांच्या आकर्षणाचे स्थान ठरली.दरम्यान शोभायात्रेतील श्रीराम मूर्ती चे जागोजागी पुष्प वर्षाव करून पूजन करण्यात आले.
सदर शोभायात्रा जुना दत्तापूर येथून निघून कॉटन मार्केट,चौक अमर शहीद भगतसिंग चौक,रेल्वे गेट,गांधी चौक व मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरून सिनेमा चौक ते टिळक चौक,छत्रपती शिवाजी चौक येथे महाआरती करून शोभयात्रेचे समारोप करण्यात आला.
…………………….
अमर शहीद भगतसिंग चौक येथे महाआरती…
श्रीराम नवमी चे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर राठी यांच्या हस्ते व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितित भव्य दिव्य महाआरतीचे
आयोजन करण्यात आले तसेच प्रचंड आतिषबाजी करण्यात आली
………………………….
शोभायात्रे दरम्यान प्रत्येक ठिकाणी शोभयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले तर अनेकांनी अल्पोपहार,जलपाणाची व्यवस्था करून भाविकांच्या गर्दीला प्रसाद वितरण केले. शोभायात्रेला यशस्वी करण्यासाठी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या विवेक गौतम,नंदू रॉय,गज्जू रॉय,किसन यादव,अमित जैस्वाल,महेश ठाकूर,मुन्ना दुबे,विनोद चौबे,तरुण दुबे,सोनम गुप्ता,विजय भगत, सुमित उपाध्यय,पवन भोसले,मंगेश नागरमोते, अंकुश रॉय,शुभम बिडकर,रवी अडतीया, चैल तिवारी,बालू यादव,रोशन गुप्ता,विशाल रॉय,शुभम जैस्वाल,धीरज परसोने,संजय अग्रवाल,गोलू शुक्ला, अर्पित साहू,रोशन लांजेवार, रवी लांजेवार, आदित्य श्रीवास,प्रणय रॉय,पियुष कांबळे,आयुष कांबळे,आयुष गुप्ता,क्रिस गुप्ता,निलेश मंडले, करण यादव,हर्ष भगत, प्रतीक धुर्वे,गौरव शुक्ला, निलेश परणकर, रोहित रॉय,अक्षय परणकर,रोहित रॉय,लकी पतालिया, अमन यादव,हर्ष बाबर,आनंद बाबर,कार्तिक मेटे,वेद गुप्ता सह शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले