शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव आहे.नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ असतो.यामुळे आपल्यात नवीन शक्ति, नवा उत्साह, नवी उमेद निर्माण होत असते. सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि भक्तांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदीमाया, जगदंबा म्हणून गौरविले..
आज दिनांक – 3 ऑक्टोबर नवरात्रोत्सव निमित्य से.फ.ला.हायस्कूल धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे..यांचे चित्र रेखाटन करून आपल्या कलेद्वारे सर्वांना मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत ..