चांदूर रेल्वे / सध्या शहरात प्रत्येक घरामध्ये महावितरण विभागाचे डिजिटल वीज मीटर लागले आहे, असे असताना सुद्धा महावितरण विभागाकडून सक्तीने प्रत्येक घरामध्ये प्रीपेड मीटर बसवण्याचे सत्र चालू होणार आहे, अगोदरच डिजिटल वीज मीटरचे भरमसाठ बिल येत असताना प्रीपेड मीटर बसवण्याचे काय कारण? असा प्रश्न विचारात बुधवारी स्थानिक ग्राहक मंच्याद्वारे महावितरण विभागाला प्रीपेड मीटर न बसवण्याच्या बाबतीत निवेदन देण्यात आले,
प्रत्येक घरामध्ये डिजिटल वीज मीटर लागले असताना महावितरण विभागाकडून प्रीपेड मीटर बसण्याचे सत्र सुरू होणार आहे, वीज कायदा 2023 कलम 55 नुसार प्रत्येक ग्राहकांना वीज मीटर निवडण्याचे स्वतंत्र आहे,
वीज मीटर बसविण्या बाबत महावितरण विभागाने अघोषित सक्तीचे वातावरण निर्माण करू नये, डिजिटल वीज मीटर खराब झाले तर दुसरे वीज मीटर बदलून देता येते,
डिजिटल वीज मीटर बसवण्यापूर्वी विज बिल कमी येत होते ,पण डिजिटल मीटर लागल्यानंतर वीज बिला मध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे, आता प्रीपेड, पोस्टपेड,स्मार्ट वीज मीटर बसविल्यानंतर वीज बिलामध्ये पुन्हा भरमसाठ वाढ होण्याची शक्यता आहे, आणि ग्राहक हे वीज बिल भरू शकणार नाही आणि त्यांना अंधारताच राहावे लागणार का? सर्वात महत्त्वाचे प्रत्येक वीज ग्राहका जवळ स्मार्ट मोबाइल किंवा तो ग्राहक प्रशिक्षित नाही मग तो शहरातील स्लम भागाचा असो किंवा ग्रामीण भागातला असो हा प्रत्येक कुटुंबाचा प्रश्न आहे, असे ही निवेदन देताना सांगण्यात आले,
प्रीपेड मीटर लावने जर सक्तीचे झाल्यास त्यात आंदोलनाचा उद्रेक होऊ शकतो, असा ग्राहक मंच यांना वाटते,
यावेळी निवेदन देताना, हरिहर मसदकर,अजय होटे ,शशिकांत गाडेकर, लक्ष्मण दरेकर, प्रभाकरराव भगोले, मंगेश बोबडे, आदी ग्राहक मंचाचे कार्यकर्ते हजर होते