अमरावती/
सरकारी स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट दर्जाची ज्वारी वाटप होत असल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महिलांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे टेबलवर दुर्गंधीयुक्त ज्वारी व भाकरी टाकुन संताप व्यक्त करीत सरकार सर्व सामान्य कुटुंबाच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याचा आरोप करीत निवेदन सादर करून समंधीतावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली.
महिण्याच्या शेवटी स्वस्त धान्य दुकाना मार्फत सरकार कडून आलेले गहू, ज्वारी, तांदूळ, मका इत्यादी धान्याचे वाटप केले जाते मात्र सदर सरकार कडून वाटप करिता आलेली धान्य योग्य आहेकी नाही याची तपासणी केली जाते त्यानंतर सदरहू धान्य वाटप केले जातात मात्र नांदगाव खंडेश्वर तालुक्यात या महिन्यात आलेली ज्वारी अंत्यत निकृष्ट दर्जाची असुन सदर ज्वारीची दुर्गंधी येत असुन त्यात (डश) जास्त प्रमाणात आहे ज्वारीत बोंड्या आहे खाण्या योग्य ज्वारी नसून त्या पासून बनलेली भाकर सुद्धा दुर्गंधी मारत आहे त्यामुळे सर्व सामान्य गोर गरिबांच्या कुटुंबाच्या आरोग्यासा धोका निर्माण होऊ शकतो म्हणुन तात्काळ ज्वारीचे धान्य परत करून समंधीत पुरवठा अधिकारी यांचेवर तात्काळ निलंबानाची कार्यवाही करावी अन्यथा पुरवठा विभागास बांगड्यांचा आहेर घालू असा ईशारा महिलांनी दिला यावेळी शिवसेनेचे विधानसभा उपसंघटक बाळासाहेब राणे शिवसेनेचे प्रकाश मारोटकर लिलाधर चौधरी बबलू सोनोने शारदाबाई सोनोने अनिता भंडारे लीलाबाई चौधरी जया नेवारे वर्षा चौधरी सारिका राऊत प्रणाली ठाकरे शिला चौधरी इत्यादी महिला उपस्थित होत्या
सरकारचा फुकट योजनेच्या नावाखाली आरोग्याशी खेळ
महायुती सरकार फुकट धान्य योज़नेच्या नावाखाली गोर गरिबांच्या जीवनाशी खेळ खेळत असून जनावरांचे धान्य हे स्वस्त धान्य दुकानांतून गरिबांना वाटप करीत आहे हे पाप महायुती सरकारला भोगावे लागेल
प्रकाश मारोटकर
माजी जिल्हाप्रमुख युवा सेना
ठाकरे गट अमरावती